पणजी : गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, खांडोळा (Khandola) यांना लवकरच केंद्र सरकारच्या (Central Government) बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून (DBT) 76 लाख रुपयांचे अनुदान मिळण्याची शक्यता आहे. संस्थेतील मायक्रोबायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सचे विज्ञान विभाग DBT द्वारे आर्थिक मदतीसाठी पात्र असल्याचे आढळले आहे आणि त्यांची शिफारस करण्यात आली आहे.
केंद्रीय ‘स्टार कॉलेज योजने’ अंतर्गत विज्ञान विभागांच्या ‘बळकटीकरण’साठी डीबीटी अनुदान देणार आहे. डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या 11व्या टास्क फोर्सच्या बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. DBT ने 2008 मध्ये अंडरग्रेजुएट स्तरावर विज्ञान-संबंधित शिक्षण घेण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. स्टार कॉलेज (College) योजनेचा वापर करून उत्कृष्टतेची उच्च क्षमता असलेल्या महाविद्यालयांची ओळख करून देतो आणि शैक्षणिक आणि प्रयोगशाळा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत दिली जाते.
या निधीमुळे शिक्षणाला चालना मिळेल आणि विद्यार्थ्यांना प्रायोगिक विज्ञानाची ओळख मिळण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ही एक मोठी उपलब्धी आहे आणि याचा फायदा गोव्यातील (goa) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.