हळदोणा येथे कुजलेल्या अवस्थेत सापडला पुरुषाचा मृतदेह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे कुटुंबीयांशी तणावपूर्ण संबंध होते.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

म्हपसा: म्हपसा पोलिसांना सोमवारी कुजलेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह मिळाला आहे. हळदोना येथील घरातून हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. थिओफिलो परेरा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे कुटुंबीयांशी तणावपूर्ण संबंध होते.

(rotting death body was found at aldona)

Goa Crime News
अबब! किती महागडी पाण्याची बॉटल...खरी कुजबुज

तीन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचा, संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ते या घरात पहिल्या मजल्यावर एकटेच राहत होते.

पहिल्या मजल्यावरून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली. नंतर ही घटना उघडकीस आली आणि कुटुंबीयांनी वरच्या मजल्यावर जाऊन मृतदेह शोधून काढला. दरम्यान, म्हापसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढे पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (जीएमसीएच), बांबोलीम येथे पाठवला.

अडीच महिन्यात 8 खुनांची नोंद; गोव्यात का वाढतेय गुन्हेगारी?

गोव्यात गेल्‍या अडीच महिन्‍यांपासून खुनाच्‍या घटना वाढल्‍याचं चित्र आहे. राज्‍यातील कायदा आणि सुव्‍यवस्‍थेवर वाढत्या गुन्हेगारीमुळे प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. एप्रिलपासून आतापर्यंत राज्‍यातील विविध पोलिस स्‍थानकांत तब्बल 8 खुनांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

(Goa Latest Crime News)

Goa Crime News
मी यापुढे निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही: राजेंद्र आर्लेकर

जंगलात सापडला महिलेचा मृतदेह; कुडचडे पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, सावर्डे ते गुड्डेमळ मुख्य रस्त्याच्या बाजूला जंगलात महिलेचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह रूपा पारकर (वय 55) असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपास करून
मृतदेह शवविच्छेदनास पाठवला होता.

शवविच्छेदन अहवालातून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान कुडचडे पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसर, मृत महिला नातेवाईकांसोबत करमणे येथे राहत होती. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पोलिस खून कुणी केला याचा कसून तपास करत आहेत. संबंधित महिलेच्या मालमत्तेची काही दिवसांपूर्वी विक्री झाली होती. त्यातून तिला बरेच पैसे मिळाले होते. "या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल आणि आरोपीला अटक करण्यात येईल," असे कुडचडे पोलिस निरीक्षक सावंत यांनी सांगितले.

(Goa Crime News Latest Update)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com