Pink Auto in Ponda
Pink Auto in PondaDainik Gomantak

Pink Auto in Ponda : फोंड्यात प्रथमच धावली ‘पिंक ई रिक्षा; ‘रोटरी क्लब’चा उपक्रम

युवतीला रोजगार, वीजमंत्र्यांनी दिल्या चाव्या
Published on

फोंड्यातील पहिली पिंक ई रिक्षा रस्त्यावर आज (शुक्रवारी) धावली. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते या पिंक ई रिक्षाची चावी निराधार असलेल्या सीमा रामनाथकर हिला देण्यात आली. रोटरी क्लब फोंडातर्फे सीमा हिला रोजगारासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली.

फोंड्यातील रोटरी क्लबच्या वास्तूत झालेल्या या कार्यक्रमाला वीजमंत्री सुदिन ढवळीकर, रोटरीचे प्रांतपाल गौरीश धोंड, रोटरी क्लब फोंडा अध्यक्ष डॉ. संतोष तिळवे तसेच सचिव सुचित्रा भट आदी उपस्थित होत्या.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंडा रोटरी क्लबने एक स्तुत्य उपक्रम आखल्यचे सांगून उपस्थितांचे कौतुक केले व लाभार्थी सीमा रामनाथकर हिचे अभिनंदन केले.

Pink Auto in Ponda
Dhavali Illegal Scrap Yard : ढवळीतील भंगारअड्डे बेकायदेशीर, मामलेदारांचा अहवाल

इंधन वाहने कमी होणार!

राज्यात सध्या डिझेल व पेट्रोल इंधनाच्या वाहनांची संख्या कमालीची जास्त आहे. या इंधनाच्या बेसुमार वापरामुळे प्रदूषणाचा त्रास संभवत असल्याने पुढील काळात ई वाहनांचा वापर होणार आहे.

येत्या २०२७- २८ पर्यंत राज्यात इंधन वाहनांची संख्या घटणार असून त्यासाठी लागणारी ६०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रक्रिया सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत ११५ मेगावॅट ऊर्जचे उद्दीष्ट आहे, तसेच सौर ऊर्जेवरही भर दिल्यास गोव्यातील प्रदूषण निश्‍चितच कमी होईल, असे वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

Pink Auto in Ponda
Mapusa News : म्हापसा पालिकेतील 120 फाईल्स गायब; बर्डेंचा आरोप

गोव्यात माणसांना मागे टाकते वाहनांची संख्या!

देशातील इतर कुठल्याच राज्यात माणसांच्या तुलनेत वाहनांची संख्या नाही. गोवा सोडून इतर राज्यात माणसांपेक्षा अर्ध्यावर वाहनांची संख्या आहे, मात्र गोवा राज्यात माणसांबरोबरच वाहनांची संख्याही बरोबरी करू लागली आहे. पुढील पाच वर्षांत माणसांना वाहनांची संख्या मागे टाकेल, असे चित्र आहे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com