Mapusa News: समतानगर-म्हापशातील सरकारी विद्यालयाच्या छपराला गळती

Goa Rain: विद्यार्थ्यांचे होताहेत हाल; शैक्षणिक खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
Goa Rain: विद्यार्थ्यांचे होताहेत हाल; शैक्षणिक खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
Roof Leakage Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे समतानगर-म्हापसा येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या छपरावर घालण्यात आलेले प्लास्टिक गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसाने उडून गेल्याने छपराला गळती लागलेली आहे.

या सरकारी शाळेमध्ये पहिली ते आठवीपर्यंत वर्ग चालतात. यामध्ये एकूण १२० विद्यार्थी आहेत तर एकूण ७ शिक्षक आणि इतर काही कर्मचारी आहेत. या शाळेकडे शैक्षणिक खात्याचे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झालेले असल्याने येथील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येत्या पावसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने येथील छपरावर प्लास्टिक घातले होते ते गेल्या दोन दिवसांपूर्वी वाऱ्याबरोबर उडून गेल्याने वर्गांमध्ये पाणी गळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये बसण्यासाठी जागा नाही.

दरम्यान, या शाळेची एकूण इमारतच कमकुवत झालेली आहे. पोर्तुगीजकालीन इमारत असून या विद्यालयाच्या सर्व भिंती पावसाच्या पाण्याने भिजून चिंब झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे इमारतीचा पाया एकदम कमकुवत झालेला आहे. त्यामुळे ही इमारत कधी कोसळून पडेल याचा नेम नाही.

Goa Rain: विद्यार्थ्यांचे होताहेत हाल; शैक्षणिक खाते तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
Goa PWD: सावधान! आता 2 महिने पाणी बिल न भरल्यास होणार 'ही' कारवाई

छप्पर दुरुस्तीची मागणी

गेल्या तीन वर्षांपूर्वी येथील विद्यालयाच्या क्रीडा मैदानाची संरक्षक भिंत कोसळली होती आणि याची कल्पना सार्वजनिक बांधकाम खात्याला देऊन त्यांनी याचे मोजमापही केलेले होते. परंतु आजपर्यंत तिचे बांधकाम करण्यात आलेले नसल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जोखमीचे झालेले आहे. त्याकडे शैक्षणिक खात्याने त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित पाहणी करून इमारतीची तात्पुरती दुरुस्ती तरी करावी व छप्पर दुरुस्त करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com