मालपेतील भंगार अड्डा झालेल्या हॉटेलची रोहन खंवटेंकडून पाहणी

जीटीडीसीच्या अध्यक्षांशी आपण चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही खंवटे म्हणाले.
Rohan Khaunte
Rohan KhaunteDainik Gomantak 
Published on
Updated on

मोरजी: मालपे येथील पर्यटन खात्याची जमीन सरकारने 2018 साली एका खासगी कंपनीला लीजवर दिली होती. संबंधित कंपनीने ही जमीन का वापरली नाही, याची चौकशी करू किंवा महसूल बुडवला असेल तर तो वसूल करू, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. याप्रकरणी जीटीडीसीच्या अध्यक्षांशी आपण चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही खंवटे म्हणाले.

मालपे पेडणे येथील पर्यटन खात्याच्या सरकारी जागेत पर्यटन खात्याने भंगार अड्डा बनवल्याची दखल घेऊन सोमवार दि. 16 रोजी सायंकाळी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी अचानक भेट देऊन या परिसराची पाहणी केली.त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

Rohan Khaunte
रामनाथी पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी...

मालपे पेडणे येथील पर्यटन खात्याच्या सरकारी जागेतील दहा वर्षांपासून गोवा दरबार हे हॉटेल बंद आहे आणि या जागेची योग्य ती देखभाल ठेवली जात नसल्याने, पर्यटन खात्याची विविध वाहने, जलक्रीडा करणाऱ्या बोटी, या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि हा परिसर भंगार अड्डा बनवला होता. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत होते. याबाबतचे प्रसिद्ध होताच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या परिसराची पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa ST Reservation Latest News
Michael Lobo Bardez Development
Goa Taxi Fare Latest Update
Subhash Velingkar Marathi Language Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com