Rohan Harmalkar: मनी लॉंडरिंग प्रकरण, हरमलकरला 14 दिवसांची कोठडी; जामीन अर्जावरील सुनावणी प्रलंबित

Rohan Harmalkar Land Scam Raid: जमीन हडप घोटाळ्यातील मनी लाँडरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या रोहन हरमलकर याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
Rohan Harmalkar
Rohan HarmalkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जमीन हडप घोटाळ्यातील मनी लाँडरिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या रोहन हरमलकर याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या ३ जूनला अटक झाली होती. त्याने जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी सध्या प्रलंबित आहे. गोव्यातील त्याच्या निवासस्थानी व कार्यालयांवर छापे टाकून सुमारे १६०० कोटींच्या जमिनींच्या मालमत्ता व्यवहारांचे दस्तावेज जप्त केले होते.

संशयित रोहन हरमलकर याच्या निवासस्थानी व कार्यालयांवर छापे टाकण्यात आले तेव्हा तो सापडला नव्हता. त्याच्याविरुद्ध मनी लाँडरिंगखाली गुन्हा दाखल केला होता. चौकशीसाठी त्याला ईडीने बोलावले त्यानुसार तो कार्यालयात आला.

Rohan Harmalkar
Goa Job: गोमंतकीय युवकांसाठी गूड न्यूज! खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही मिळणार संरक्षण, CM सावंतांची घोषणा

त्याची चौकशीदरम्यान रात्री उशिरा अटक झाली होती. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची ईडी कोठडी दिली होती. ही कोठडी काल संपल्याने त्याला आज न्यायालयात उभे केले होते. त्याने जामिनासाठी अर्ज केला आहे त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. तो राजकारणात येऊ पाहत असल्याने ईडीचा ससेमिरा लावला गेला आहे असा दावा जामीन अर्जात त्याने केला आहे.

Rohan Harmalkar
Goa Assembly Monsoon Session: गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 दिवस चालणार? मंत्री गावडे, राणे विरोधकांच्या रडारवर

‘ईडी’कडून मालमत्तांची छाननी सुरू

२४ व २५ एप्रिल २०२५ रोजी ईडीने हरमलकर याच्या पिळर्ण, पर्वरी, दिवाडी व इतर ठिकाणच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांवर छापे टाकले.

या छाप्यांवेळी सुमारे १ हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेली हणजूण, हडफडे, आसगाव व इतर ठिकाणच्या जमिनींची तसेच ६०० कोटींपेक्षा अधिक किमतीच्या स्थावर मालमत्तांचा दस्तावेज जप्त करण्‍यात आला होता. याव्यतिरिक्त त्याच्या पिळर्ण येथील घराला सीलही ठोकले होते. हाती लागलेल्या दस्तावेजांची चौकशी व छाननी ‘ईडी’ने सुरू केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com