Mormugao
Mormugao Dainik Gomantak

मुरगावातील रस्ते काळवंडले, लोक त्रस्त

कंत्राटदारावर कडक कारवाईची मागणी
Published on

वास्को : मुरगाव बंदरातून ट्रकमधून निर्यात होणारा कोळसा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकमधून सांडल्याने शहरातील घरे-इमारतींमध्ये कोळशाची भुकटी पसरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशा बेजबाबदार कोळसा वाहतुकीवर (Transport) नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Mormugao
चर्चबाबत कोणतंही वादग्रस्त वक्तव्य नाही, मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले

शुक्रवारी मध्यरात्री मुरगाव (Mormugao) बंदरातून कोळसा घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधून कोळसा मोठ्या प्रमाणात सांडल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले नाही. तो तसाच पुढे गेला असता, चर्च सर्कल ते मुंडवेल, वाडे, चिखली भागात मोठ्या प्रमाणात कोळसा रस्त्यावर सांडला. वाऱ्यामुळे ही कोळशाची भुकटी येथील इमारती, घरे, दुकाने तसेच इतर आस्थापनांमध्ये पसरली. ती साफ करेपर्यंत लोकांच्या नाकीनऊ आले.

हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने चिखली येथे ट्रक थांबवून कोळशावर आवरण झाकले. नंतर रस्त्यावर सांडलेला कोळसा पहाटेपूर्वीच कोळसा कंपनी आणि वाहतूक कंत्राटदाराच्या कामगारांनी हटवला. संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com