Mayem News: मयेत मोकाट गुरांची समस्या गंभीर! अपघातांना निमंत्रण; प्रत्यक्ष कारवाई कधी?

Mayem Stray Cattles: मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
Maye Stray Cattles, Stray Animals Mayem
Maye Stray CattlesDainik Gomantak
Published on
Updated on

Mayem Stray Cattles

डिचोली: मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असून, रस्त्यावर ठाण मांडणाऱ्या गुरांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत मयेत दाम्पत्यासह तिघांवर गुरांनी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत.

मोकाट गुरांविरोधात मोहीम हाती घेण्याचा निर्णय मये पंचायतीने घेतला असला, तरी अद्याप प्रत्यक्ष कारवाई सुरु झालेली नाही. ही कारवाई कधी? असा प्रश्न वाहनचालकांसह नागरिक व्यक्त करीत आहेत.

गेल्या २७ ऑक्टोबर झालेल्या मये पंचायतीच्या ग्रामसभेत मोकाट गुरांचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी गुरे रस्त्यावर सोडल्यास या मोकाट गुरांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सरपंच सीमा आरोंदेकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र एक आठवडा उलटला, तरी अद्याप कारवाई सुरु झालेली नाही.

गुरांकडून हल्ला करण्याच्या घटना

रस्त्यावरील गुरांकडून हल्ला करण्याचे प्रकारही घडत आहेत. वर्षांपूर्वी केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले होते. गावकरवाडा-मये येथील शिरोडकर दाम्पत्य स्कूटरवरुन डिचोलीच्या दिशेने जात होते. केळबायवाडा येथे चढणीवर पोचताच रस्त्यावरील गुरांनी स्कूटरला धडक दिली. त्यात शिरोडकर नवरा-बायको स्कूटरसह रस्त्यावर पडून जखमी झाले होते. तर दोन वर्षांपूर्वी केळबायवाडा येथे गुरांनी केलेल्या हल्ल्यात तेथीलच एका हॉटेलमालकाचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. या गुरांपासून मोठा अनर्थ घडण्यापूर्वी या गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थ करीत आहेत.

Maye Stray Cattles, Stray Animals Mayem
Goa Tourism: विदेशी पर्यटकांची गोव्‍याऐवजी श्रीलंकेला पसंती! वाढीव व्‍हिसा शुल्‍काचा परिणाम; रशियन पर्यटकांचे मात्र प्राधान्‍य

रस्त्यावर मांडतात ठाण

मये भागात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केळबायवाडा ते हळदणवाडीपर्यंतच्या रस्त्यावर तर मोकाट गुरे सदैव रस्त्यावर संचार करताना आढळून येतात. गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. बऱ्याचदा ही गुरे रस्त्यावर ठाण मांडलेली आढळून येतात. रात्रीच्यावेळी तर रस्त्यावरील या गुरांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो. वाहने हाकताना वाहनचालकांना तर अक्षरशः कसरत करावी लागते. गुरांमुळे अपघातांनाही निमंत्रण ठरत आहे. गुरांमुळे लहानसहान अपघातही घडत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com