Fatorda News : कचरावाहू कॉम्पॅक्टरमधील सांडपाण्यामुळे मडगावातील रस्ते बनले निसरडे; अनेक दुचाकीस्वार पडून जखमी

Fatorda News : रसत्यावर पडणाऱ्या या सांडपाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार निसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. या विषयाची दखल घेऊन नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Fatorda
FatordaDainik Gomantak

Fatorda News :

फातोर्डा, मडगाव नगरपालिकेच्या कचरावाहू कॉम्पॅक्टरमधील कचऱ्यातील सांडपाणी रस्त्यावर सांडत असल्याने पादचारी व दुचाकीस्वार वाहनचालकांसाठी ते धोक्याचे बनले आहे.

रसत्यावर पडणाऱ्या या सांडपाण्यामुळे अनेक दुचाकीस्वार निसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. या विषयाची दखल घेऊन नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या कॉम्पॅक्टरद्वारे मडगाव आणि फातोर्डा परिसरातील हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट, भाजी विक्रेते आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा ओला कचरा उचल करण्यात येत आहे. हा कचरा कॉम्पेक्टरमध्ये ओव्हरलोड झाल्यास या कचऱ्यातील घाण पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर पडते. त्यामुळे रस्ता निसरडा बनतो.

Fatorda
Goa SSC Exam: गोव्यात पूर्णत: अंध विद्यार्थ्याने संगणकाच्या मदतीने कशी दिली दहावीची परीक्षा?

आकेपासून हाउसिंगबोर्डपर्यंतच्या रस्त्यावरून जाताना या कचऱ्याच्या पाण्यावर निसरून पडलेल्या सुशांत नाईक यांनी सांगितले, की आके येथील बाबू नायक निवासस्थानाच्या उतरणीच्या रस्त्यावरून जाताना कचऱ्याचे पाणी सांडलेल्या ठिकाणी दुचाकी घेऊन खाली पडल्याने कमरेच्या खाली डाव्या बाजूच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com