Roads in Goa
Roads in Goa Dainik Gomantak

गोव्यातील रस्ते खोदलेल्या अवस्थेत; वाहन चालकांची गैरसोय

गोव्यात मान्सून 5 जूनला दाखल होईल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे.
Published on

पणजी: गोव्याच्या अनेक भागातील रस्ते गॅस पाइपलाइनची कामे करण्यासाठी खदलेले आहेत. यामुळे वाहन चालकांची गैरसोय होत आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी संपणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही. परिणामी पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. (Roads in goa dug up drivers face inconvenience)

Roads in Goa
'पुढील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस गोव्यात 27 जागा जिंकणार'

गोव्यात मान्सून 5 जूनला दाखल होईल असा अंदाज IMD ने वर्तवला आहे. मान्सूनदरम्यान खोदलेल्या रस्त्यांवरून होणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल, असे लोकांचे म्हणणे आहे.

Roads in Goa
गोव्यातील आजचे इंधनाचे दर जाणून घ्या

पणजीमधील बहुतांश रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही. इंडियन ऑइल-अदानी गॅस प्रा. लि.ने नुकतेच फॉन्टेनहास परिसरातील खोदलेले रस्ते मातीने झाकले आहेत. जोरदार पाऊस झाल्यास पुन्हा खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.

पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर म्हणाले की, "गोव्यात पावसाळा कधीही सुरू होऊ शकतो. अशा वेळी रस्ते खोदणे वाहनांसाठी तसेच पादचाऱ्यांसाठीही धोकादायक ठरेल. माझ्या महापौरपदाच्या कार्यकाळात आम्ही परवानगी नाकारली होती."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com