Goa Highway: भोममधून रस्ता रुंदीकरण अटळ

Goa Highway: विरोध डावलला: उर्वरीत फोंड्याकडील बाजूच्या भूसंपादनासाठी अंतिम अधिसूचना जारी
Goa Highway
Goa HighwayDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Highway: भोमवासीयांचा प्रचंड विरोध असूनही भोम गावातील ‘स्टिल्ट’ खांबांवरील चौपदरी रस्ता अखेर अटळ ठरला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी मोले ते पणजीपर्यंतच्या 748 क्रमांक महामार्गाच्या चौपदरीकरणातील शापूर - बांदोडा फोंडा ते भोमपर्यंतच्या रस्त्यासाठी जमीन संपादनाची उर्वरित प्रक्रिया केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सुरू केली आहे.

Goa Highway
Goa Panchayat: पंचायत संचालनालयात खटले तुंबले

भोम गावातून खांबावरील चौपदरी रस्ता नेण्यास तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. या विरोधासाठी भोमच्या ग्रामस्थांनी सभा, बैठका घेतल्या, आवाज उठवला आणि तीव्र विरोध केला असला तरी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाने त्याला न जुमानता गावातूनच रस्त्याला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

वास्तविक भोमवासीयांनी गावचे अस्तित्व आणि अस्मिता राखण्यासाठी गावातून खांबावरून जाणाऱ्या चौपदरी रस्त्याला विरोध केला होता. हा चौपदरी रस्ता भोम गावातून न जाता गावाच्या वरच्या बाजूने बगल रस्त्याने न्यावा अशी भोमवासीयांची मागणी आहे. या मागणीला अनुसरून भोम गावात मागच्या सहा महिन्यांपासून सभा बैठकांना जोर आला होता. मध्यंतरी प्रकरण शांत वाटत असतानाच आता केंद्र सरकारच्या रस्ते महामार्ग मंत्रालयाने शापूर - बांदोडा ते भोमपर्यंतच्या रस्त्याच्या जमीन संपादनाची जाहिरात दिल्यामुळे निर्धारित मार्गच स्वीकारण्याचा सरकारचा हेतू स्पष्ट झाला आहे.

Goa Highway
Tribes Reservation: अनुसूचित जमातींना 2027 पर्यंत आरक्षण

या चौपदरी रस्त्यासाठी फोंडा तालुक्यातील बांदोडा, कुंकळ्ये, कुंडई व वेलिंग गावातील जमिनीच्या संपादनासाठी प्रत्यक्षात प्रक्रिया सुरू केली आहे. वास्तविक या चौपदरी रस्त्यासाठी आवश्‍यक जमीन संपादन करण्यात आली असली, तरी या चौपदरी रस्त्याची नियोजित जादा वळणे तसेच जोडरस्त्यांसाठी हे जमीन संपादन होणार आहे, त्यात कोरडी व ओलिताखालील जमिनीचा समावेश आहे. या मार्गासाठी एकूण 3.4074 हेक्टर जमिनीचे संपादन त्यामुळेच करावे लागत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बांदोडा ते भोमपर्यंत भूसंपादन

शापूर - बांदोडा येथील भुयारी मार्गासह फर्मागुढी ते वेलिंग व पुढे कुंडईतील काळी माती व भोमपर्यंतच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. शापूर येथे पुरातन साफा मशीद असल्याने या ठिकाणी भुयारीमार्ग बांधण्यास केंद्रीय पुरातत्व खात्याने हरकत घेतली होती. त्यामुळे या भागातील लोकांना धोकादायक वळसा घेऊन शापूर गाठावे लागते. आता बांदोडा रस्त्याला लागून भुयारीमार्ग बांधण्याची योजना संमत झाली असून या कामाला प्रत्यक्ष सुरवातही झाली आहे.

4 घरांसह 11 दुकाने जाणार!

शापूर ते भोमपर्यंतच्या या महामार्ग रुंदीकरणासाठी फक्त भोम गावातील चार घरांसह 11 गाडे तथा दुकाने हटवावी लागणार आहेत. चार घरांना भोम अडकोण पंचायतीजवळ प्लॉट देण्यात येणार असून भोम येथील शाळेसमोरच अकरा गाड्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. भोम गावातील खांबावरील चौपदरी रस्ता फोंड्याच्या बाजूने काळी माती येथे जोडण्यात येईल, तर बाणस्तारी भागाकडील खांबांवरील चौपदरी रस्ता मुस्लीमवाडा येथे जोडण्यात येईल. याशिवाय भोम गावातील रस्ता ३० मीटर रुंद असेल, तर खोर्ली भागातील रस्ता 25 मीटर रुंद असेल. उर्वरित रस्ता ४५ मीटरचा ठेवण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com