Road Safety Week : ''वाहतूक नियमांचे भान ठेवा'' पुंडलिक सावंत ; शिरगाव-अस्नोडा विद्यालयात जनजागृती कार्यक्रम

याचे कारण म्हणजे वाहनावर वाहनचालकाचा ताबा नसणे हे होय.
Shirgaon-Asnoda School goa
Shirgaon-Asnoda School goaDainik Gomantak
Published on
Updated on

Road Safety Week : बार्देश, राज्यात रस्‍तेअपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसाला दोघा-तिघांचा बळी जात असून, अनेकजण जखमी तसेच जायबंदी होत आहेत. याचे कारण म्हणजे वाहनावर वाहनचालकाचा ताबा नसणे हे होय.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आणि मुख्‍य म्‍हणजे मद्यप्राशन करून वाहन चालविणे यामुळे जीवघेणे अपघात होतात. त्‍यामुळेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भान राखून वाहन चालवावे, असे आवाहन डिचोली वाहतूक विभागातर्फे हेड कॉन्स्टेबल पुंडलिक सावंत यांनी केले.

शिरगाव-अस्नोडा सरकारी माध्यमिक विद्यालयात रस्तासुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावंत बोलत होते.

यावेळी मुख्याध्यापिका सिद्धी कानोळकर, शिक्षिका सुजाता प्रभुदेसाई, सुवर्णकांत शेटकर, प्रियांका नाईक, रिया मयेकर, कृतिका मांद्रेकर, वेदिका परब, सीमा मठकर, कृतिका सरप, एकता नाईक आणि मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

वाहनचालकाकडे वाहन परवाना असलाच पाहिजे. त्याचबरोबर इतर कागदपत्रेही असणे आवश्यक आहे. अन्‍यथा कुणाची तरी चोरीची गाडी असल्याच्‍या संशयाने संशयित गुन्हेगार म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.

रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंनी वाहने येतात का नाही हे पाहणे गरजेचे आहे. १८ वर्षे पूर्ण झाल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी वाहन परवाना काढावा. त्या अगोदर वाहन चालवताना अपघात झाला किंवा तर त्‍याच्‍या वडिलांविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com