वास्को ते कंदब बसस्थानकापर्यंतचे खड्डे बुजविण्यास सुरुवात

वास्को ते कंदब बसस्थानकापर्यंत्त मे महिन्यात केला होता रस्ता
vasco Road
vasco Road Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्को वाडे ते मुंडवेल कदंब बसस्थानकपर्यंत्त सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाने मुळ आवरण हॉटमिक्स डांबरीकरण केले होते. मात्र सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोवा शिपयार्ड ते कदंब बसस्थानकपर्यंन्तचा रस्ता खड्डामय बनल्याने, वास्कोच्या आमदार कृष्णा साळकर यांनी नाराजी व्यक्त केली.

तसेच रस्ता करणाऱ्या कंत्राटदाराने उर्वरीत रस्ता जो पर्यंत्त करीत नाही, तो पर्यंत त्याचे उर्वरीत निधी दिले जाणार नसल्याची धमकी देताच रस्ते विभागाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. ( Road repairs begin from Vasco to Kadamba bus stand )

vasco Road
कुंकळ्ळी येथील अपघातात एक जखमी

वास्को ते कंदब बसस्थानकापर्यंत्त मे महिन्यात केलेला मुळ आवरण (बेस कोट) हॉटमिक्स डांबरीकरण रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालकांने नाराजी व्यक्त केली होती. तसेच स्थानिक आमदार कृष्णा साळकर यांनी नाराजी व्यक्त करून सबंधित कंत्राटदाराचा उर्वरीत नीधी दिली जाणार नसल्याची धमकी देताच, सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाच्या अधिकाऱ्या बरोबर कंत्राटदाराने रविवार (दि.३) वास्कोतील मुळ आवरण केलेल्या रस्त्यावर पाडलेले खड्डे बुजविण्यास सुरूवात केली.

vasco Road
राष्ट्रवादीच्या 'त्या' 2 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

तसेच उर्वरीत रस्ता हा पावसाळा संपल्यानंतर करणार असल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत देण्यात आली आहे. गोव्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने याचा फटका जास्त करून रस्त्यांना बसतो. यामुळे सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागते.

दरम्यान वास्कोतील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाने युध्दपातळीवर सुरू केले असून येत्या दोन दिवसात शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील अशी माहिती कार्यकारी अभियंता विन्सन डिसोझा यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com