अपघातग्रस्‍त कँटर हटविल्‍याने बोरीतील रस्‍ता अखेर मोकळा

दै. ‘गोमन्‍तक’ने आवाज उठवून संबंधित खात्‍याला जाग आणून दिली
Road in Borim was finally cleared by removing canter which had been damaged in accident
Road in Borim was finally cleared by removing canter which had been damaged in accidentDainik Gomantak
Published on
Updated on

बोरी: बोरी येथे सात दिवसांपूर्वी कँटरला झालेल्‍या अपघातामुळे रस्‍ता अडविला गेला होता. त्‍यामुळे वाहतुकही खोळंबली होती. याबाबत दै. ‘गोमन्‍तक’ने आवाज उठवून संबंधित खात्‍याला जाग आणून दिली होती. त्‍याचा परिणाम म्‍हणून खात्‍याने तातडीने कँटरचा अर्धा भाग काढून रस्‍ता मोकळा केला. याबद्दल गामस्‍थ आणि वाहनचालकांनी समाधान व्‍यक्त करून ‘गोमन्‍तक’ला दुवा दिला आहे.

वास्कोहून बेळगावच्या दिशेने मोठ्या टाक्या घेऊन जाणाऱ्या कँटरने गेल्‍या शुक्रवारी एका ट्रकला धडक दिली होती.

Road in Borim was finally cleared by removing canter which had been damaged in accident
गोव्यात 10 रुपयांच्या नोटांचा तुटवडा

त्‍यात कँटरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला होता. हा कँटर गेले सात दिवस रस्ता अडवून तसाच पडला होता. त्यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना बाजू देता येत नसल्याने अपघात वाढले होते व वाहतुकीची कोंडीही होत होती. याबाबत ‘गोमन्‍तक’ने काल छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्‍यामुळे संबंधित अधिकारी जागे झाले व त्‍यांनी आज गुरुवारी सकाळपासून कर्मचाऱ्यांना कामाला लावून अपघातग्रस्‍त कँटरचा मागचा मोठाला भाग आणि त्यात असलेल्या टाक्या अन्यत्र हलवून रस्ता मोकळा केला.दरम्‍यान, कँटरचा चेंदामेंदा झालेला भाग आता रस्त्यावर शिल्लक राहिला आहे. हा भागही लवकरच काढून टाकून रस्ता पूर्णपणे मोकळा करावा अशी वाहनचालक आणि रहिवाशांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

bingson john conman arrested raipur
Goa Police Seniority Dispute Case
mandar surlakar murder case goa
goa archives department digitization
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com