Blitz Chess Tournament: ऋत्विज परब ब्लिट्झ बुद्धिबळात विजेता! अपराजित कामगिरी

नीतिन बेलुरकरला उपविजेतेपद, मंदार लाड तिसरा
Blitz Chess Tournament
Blitz Chess TournamentDainik Gomantak

Blitz Chess Tournament: ऋत्विज परब याने अपराजित कामगिरीसह ११ फेऱ्यांतून साडेदहा गुणांची कमाई करताना श्रीमती सुनंदाबाई दयानंद बांदोडकर स्मृती मानांकन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम स्मृती सभागृहात झाली.

Blitz Chess Tournament
54th IFFI In-Conversation: सिनेमा हा सिनेमा असतो त्याला कशाचे बंधन नसते- करण जोहर

इंटरनॅशनल मास्टर नीतिश बेलुरकर उपविजेता ठरला. त्याने साडेनऊ गुणांची नोंद केली. नऊ गुणांसह मंदार लाड याला तिसरा क्रमांक मिळाला. या अखिल भारतीय स्पर्धेत पहिले तिन्ही क्रमांक गोमंतकीय बुद्धिबळपटूंना मिळाले.

आदित्य सावळकर, एम. पी. अजित, आयुष शिरोडकर, के. यू. मार्थांदन, ई. यू. एहाझ, जे. रामकृष्ण, एड्रिक वाझ, आर्यन रायकर, ओ. टी. अनिलकुमार, देवेश नाईक, नीरज सारिपल्ली, महिंद्र करजी, किर्पेश, सिशांत पूंजा, अनीश नाईक, निरंजन राजीव, सरस पोवार, आदर्श पटेकर, मनोज रेड्डी, जोशुआ तेलिस, रुद्र, दर्श भट यांनाही बक्षिसे मिळाली.

व्हेटरन गटात मदनलाल जुनेजा व सुहास अस्नोडकर, तर महिला गटात अवनी आचार्य व ड्विनी फर्नांडिस यांना सर्वोत्तम कामगिरीचे बक्षीस प्राप्त झाले.

बक्षीस वितरण उत्पल पर्रीकर, महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर, अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, सत्यवान हरमलकर, शिरीष दिवकर, राजन कडकडे, आतीश आंगले, नरेश पेडणेकर, कुमारसेन कांबळी यांच्या उपस्थितीत झाले.

धेंपे बुद्धिबळ स्पर्धेत पाचजणांना आघाडी

दरम्यान, श्री वासुदेव व्ही. धेंपे स्मृती फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीअंती पाच खेळाडूंनी प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. यामध्ये ग्रँडमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी, ओ. टी. अनिलकुमार, सांतू मोंडल, जे. रामकृष्ण व आदित्य सावळकर यांचा समावेश आहे. आयुष शिरोडकर, मंदार लाड, साईरुद्र नागवेकर, जोशुआ तेलिस, सौरीश कशालकर, सिद्धांत पूंजा, प्रदीप तिवारी, अजयकुमार राय यांच्या खाती प्रत्येकी साडेपाच गुण आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com