डिझेल दरवाढीमुळे खाजगी बसमालक त्रस्त, महसुलात घट; 'कदंब'चे तिकीट दर मात्र 'जैसे थे', प्रवाशांना दिलासा

Rising Diesel Prices Private Bus Operators: डिझेलच्या वाढत्या दरामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वाढत्या खर्चामुळे खासगी बस ऑपरेटर हवालदिल झाले आहेत.
Rising Diesel Prices Private Bus Operators
Rising Diesel Prices Private Bus OperatorsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: डिझेलच्या वाढत्या दरामुळे सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. वाढत्या खर्चामुळे खासगी बस ऑपरेटर हवालदिल झाले आहेत. दुसरीकडे तिकिट दर ‘जैसे थे’ ठेवून सरकारी कदंब परिवहन महामंडळाने मात्र प्रवाशांना दिलासा दिला आहे.

डिझेलच्या वाढत्या दरांमुळे खाजगी बस चालकांचे कंबरडे मोडले आहे. ऑल गोवा प्रायव्हेट बस ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

Rising Diesel Prices Private Bus Operators
Goa Politics: 'आरजी' निर्नायकी; वीरेशचे अद्याप मौन, पुढील सूत्रे कुणाच्‍या हाती? कार्यकर्ते संभ्रमात, नेतृत्वाबाबत गूढ वाढले

ताम्हणकर म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या दरांमुळे खाजगी बस ऑपरेटर्सना दररोज तब्बल १५० ते २०० रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. त्यातच प्रवाशांची संख्या घटल्याने दैनंदिन महसूल घसरला आहे. सध्या ट्रिपची संख्या कमी करण्याचा प्रश्नच येत नाही.

कारण चालक तसेच वाहक यांचा पगार द्यावा लागतो. त्यामुळे वेळापत्रक नुसार खासगी बस चालक ट्रीप मारत आहेत. सद्यस्थितीत तिकिट दरवाढीचा विषयच नाही. आधीच सरकारने लोकांवर अतिरिक्त आर्थिक बोजवारा टाकला आहे. ही स्थिती नैसर्गिक नसून, मानवनिर्मित आपत्ती असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांनी महामंडळाच्या आधुनिकीकरणाची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. गोव्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी लवकरच २०० नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या जाणार आहेत.

राज्यात चुकीचे वाहतूक धोरण!

ताम्हणकर यांनी गोव्यातील सार्वजनिक वाहतूक क्षेत्रातील या ढासळत्या स्थितीला सरकारचे चुकीचे वाहतूक नियोजन आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. योग्य नियोजनाअभावी खाजगी वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

Rising Diesel Prices Private Bus Operators
Goa Fishing Ban: कुटबण जेटीवर मासेमारी बंदीबाबत कडक नियम; बोटी-जाळ्यांवर निर्बंध, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई

‘कंदब’ची तिकीट दरवाढ नाही!

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर, सरकारी बस प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी स्पष्ट केले आहे की, डिझेलच्या किमतीत वाढ होत असली तरी कदंब बसच्या तिकिट दरांमध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com