Rice harvesting by machine
Rice harvesting by machineTukaram Sawant

Bicholim News : वायंगण भातशेतीची कामे जोरात; डिचोलीत यंदा पीक समाधानकारक

कापणी आणि मळणीला वेग
Published on

डिचोली तालुक्यातील विविध भागांत सध्या वायंगण भातशेती कापणी आणि मळणीची कामे जोरात सुरू असून, मयेसह काही भागांत ही कामे पूर्ण झाली आहेत. पुढील आठवड्यापर्यंत अन्य भागांत कापणी-मळणीची कामे पूर्णत्वास येणार आहेत.

अनुकूल हवामानामुळे यंदा वायंगण भातपीक समाधानकारक आले आहे. गेल्या वर्षी ऐन कापणीच्या वेळी अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. त्यामुळे मयेसह काही भागांतील शेतकऱ्यांना फटका बसला होता.

यंदा डिचोलीत भातपीक समाधानकारक असल्याची माहिती कृषी खात्याकडून उपलब्ध झाली आहे. मळणीची कामे पूर्ण झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी ‘वारे’ देऊन भात घरी नेले आहे.

Rice harvesting by machine
Drishti Marine : ‘दृष्टी’चे श्वानही वाचवणार आता लोकांचा जीव!

950 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली

डिचोली विभागीय कृषी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पिळगावसह, मये, साळ, लाडफे, बोर्डे आदी भागांत वायंगण शेतीची परंपरा अजूनही कायम आहे. या भागातील शेतकरी खरीप भातपिकासह वायंगण शेती करतात.

डिचोलीत तालुक्यात यंदा सुमारे ९५० हेक्टर वायंगण शेतजमीन लागवडीखाली आली आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडून तशी माहिती उपलब्ध झाली आहे.

Rice harvesting by machine
Goa Police: पोलिसांची 'ही' शक्कल ठरली भारी; एका दिवसात सापडले 28 दलाल...

सुर्लात 18 वर्षांनंतर वायंगण शेती

तब्बल अठरा वर्षांच्या खंडानंतर यंदापासून सुर्ल येथील शेतकऱ्यांनी वायंगण शेती लागवडीखाली आणली आहे. सुर्लातील वायंगण शेती चांगली बहरली असून, शुक्रवारी सुर्ला गावात कापणी आणि मळणीची कामे सुरू झाली.

अठरा वर्षांनी शेती लागवडी आणली. अखेर आमच्या कष्टाचे चीज झाले, असे विष्णू नाटेकर आणि अन्य शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

"गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुकूल हवामानामुळे यंदा वायंगण शेती पीक समाधानकारक आले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. यंदा ही आपत्ती ओढवलेली नाही. रोग-किडीचा प्रादुर्भावही झालेला नाही. यंत्राद्वारे मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान मिळत आहे."

दत्तप्रसाद जोग, कृषी विस्तार अधिकारी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com