Goa News : राज्यपालांनी विधेयकांना मंजुरी देऊ नये : वीरेश बोरकर

मागणीचे निवेदन राज्यपालांना सुपूर्द
RGP MLA Viresh Borka
RGP MLA Viresh BorkaDainik Gomantak
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी विधानसभेत कृषी जमीन हस्तांतरण प्रतिबंधक विधेयक 2023 आणि कोमुनिदाद जमिनीसंबंधीची विधेयके विधासभेत पारित करण्यात आली. ही दोन्ही विधेयके गोमंतकीयांच्या हिताची नसल्याने राज्यपालांनी ही विधेयके फेरविचारासाठी पाठवावी असे निवेदन आरजी पक्षाने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना दिले आहे.

माध्यमांशी बोलताना आमदार वीरेश बोरकर म्हणाले, सरकारने जे विधेयक पारित केले, त्यात शेतकरी, शेतजमीन यांची योग्य व्याख्या केलेली नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. आमच्या पूर्वजांनी ज्या कोमुनिदाद जमिनी राखून ठेवल्या होत्या त्यादेखील कुणाच्या तरी घशात घालण्याचा डाव आहे.

RGP MLA Viresh Borka
Margao Urban Bank : मडगाव अर्बनला ‘सर्वोच्च’ धक्का; याचिका फेटाळली

आम्ही आमचे या दोन्ही विधेयकांवरील हरकतीचे मुद्दे विधानसभेत तसेच माध्यमांसमोर यापूर्वीही मांडले आहेत. ज्या-ज्या संघटना या विधेयकाचा विरोध करत आहेत आम्ही त्यांच्या सोबत असणार आहे.

आरजी नेते मनोज परब म्हणाले, कृषी विधेयकात कृषीच्या योग्य व्याख्या नाहीत. त्यासोबतच काजू, केळी, नारळ बागायतीचा उल्लेखदेखील नाही. येत्या विधानसभा अधिवेशनात आम्ही जमीन विक्री प्रतिबंधासंबंधीचे एक विधेयक आणणार असून त्यावेळी हे सरकार कितपत शेती बचावासाठी प्रयत्नरत आहे हे स्पष्ट होईल. हे विधेयक गोव्यातील जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्यासाठी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com