

पणजी : स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’चे (आरजी) आमदार वीरेश बोरकर यांनी कुडका येथे सुरू असलेले रस्त्याचे कथित बेकायदेशीर काम रविवारी बंद पाडले.
जेसीबीच्या साहाय्याने सुरू असलेल्या रस्ताकामाची पाहणी करत बोरकर यांनी संबंधितांकडून आवश्यक परवानग्या आणि मंजुरीबाबत माहिती घेतली. योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही विकासकाम सुरू करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामस्थांनीही या हस्तक्षेपाचे स्वागत केले असून, रस्ता बांधकामामुळे पर्यावरणीय तसेच कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली. प्रशासनाने पारदर्शकता राखूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणाचा कायद्यानुसार निपटारा होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल. सर्व परवानग्यांची संबंधित सरकारी विभागांनी तातडीने तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाई करावी.
- वीरेश बोरकर, आमदार
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर कारवाई
कुडका येथील काही रहिवाशांनी रस्त्याच्या कामाबाबत तक्रारी केल्यानंतर आमदार वीरेश बोरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. कामाची पाहणी करून त्यांनी बांधकाम तात्पुरते थांबविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.