Puran Farming: केरी-सत्तरीत तब्बल 46 वर्षांनी ‘पुरण शेती’ पुनर्जीवित! कळटी नदी परिसरात पारंपरिक शेतीला नवसंजीवनी

Traditional Farming Goa: गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान, पर्वरी-गोवा, गोवा विद्यापीठ तसेच केरी येथील ‘आमचें दायज’ ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
Traditional Puran Farming Revival Goa
Traditional Puran Farming Revival GoaDainik Gomanak
Published on
Updated on

वाळपई: कृषिप्रधान आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या सत्तरी तालुक्यातील कळटी नदी (कनकीची कोंड), गडवाडा-केरी सत्तरी परिसरात तब्बल ४६ वर्षांनंतर पारंपरिक ‘पुरण शेती’ पुनर्जीवित करण्यात आली आहे. या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी ‘पुरण उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गोवा राज्य संशोधन प्रतिष्ठान, पर्वरी-गोवा, गोवा विद्यापीठ तसेच केरी येथील ‘आमचें दायज’ ट्रस्ट यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. लोककलाकार गोपीनाथ गावस यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गावस, सोमा माजिक, लोककलाकार सूर्यकांत माजिक, रामचंद्र गावस, माजी कस्टम अधिकारी तुळशीदास नायक तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव केरकर यांच्या सहकार्यातून हा ध्यास साकार झाला.

Traditional Puran Farming Revival Goa
Goa Agriculture: दुर्गंधीयुक्त मळीमुळे मिरची शेती धोक्यात, खालवडे-काणकोण येथे ओहोळाच्या पाण्यासह शेतजमीनही प्रदूषित

केरीच्या विवेकानंद ज्ञान मंदिर माध्यमिक विद्यालय, श्री भूमिकामाता माध्यमिक विद्यालय तसेच गणपत पार्सेकर शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, पेडणे येथील विद्यार्थ्यांनी उत्सवात सहभाग घेत पुरण रोवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सुमारे शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी पुरण शेतीचा इतिहास व भौगोलिक पार्श्वभूमी जाणून घेतली. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अभ्यासक्रमात समाविष्ट भारतीय ज्ञान प्रणालीच्या भाग म्हणून ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली.

Traditional Puran Farming Revival Goa
Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

प्रकाश पर्येकर यांचे मार्गदर्शन

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरण शेतीचा वावर सुरू करण्यात आला. सत्तरीत गेल्या काही वर्षांत चार ठिकाणी पुरण शेती सुरू करण्यात आली आहे. त्यात यंदा वाळवंटी नदीच्या केरी येथील पुरण शेतीचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांमध्ये डॉ. प्रकाश पर्येकर यांचे सहकार्य लाभले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com