Goa| किमान वेतनात त्वरित सुधारणा करा; कामगार प्रतिनिधी आणि संघटनांची मागणी

गोव्यातील किमान वेतन मार्च 2016 मध्ये सुधारित करण्यात आले होते, आणि त्यानंतर किमान वेतनात त्यांची कोणतीही सुधारणा झालेली नाही.
gidc
gidcDainik Gomantak 
Published on
Updated on

गोवा: गोव्याच्या इंडस्ट्रीज असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने किमान वेतन सुधारणेबाबत नुकतेच केलेले विधान गोव्यातील कष्टकरी लोकांविरुद्ध असुन, अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील असल्याने त्याचा निषेध करणे आवश्यक आहे.

(Revise minimum wage immediately Demands of labor representatives and unions in goa)

gidc
Goa Crime : हळदोण्यात दुचाकींच्या डिकीतून मोबाईल चोरणारा आरोपी अखेर गजाआड

गोव्यातील किमान वेतन मार्च 2016 मध्ये सुधारित करण्यात आले होते, आणि त्यानंतर किमान वेतनात त्यांची कोणतीही सुधारणा झालेली नाही. किमान वेतन सुधारित होऊन जवळपास पाच वर्षे झाली आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, वीज, वाहतूक, शिक्षण, आरोग्य सेवा यांच्या किमती चिंताजनक दराने वाढल्या आहेत, तर कष्टकरी लोकांची मजुरी पुरेशी वाढ आणि सुधारणा न होता स्थिर आहे. त्यामुळे कष्टकरी लोकांना स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत कठीण होत आहे. म्हणून सर्व संघटना आणि कामगार प्रतिनिधी किमान वेतनात त्वरित सुधारणा करण्याची मागणी करत आहेत, सध्या अकुशल श्रेणीसाठी प्रतिदिन रुपये 307/- आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com