जीर्ण जलवाहिन्या बदला ः उपसभापती फर्नांडिस

काणकोण ः लोलये पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना उपसभापती इजिदोर फर्नांडिस. बाजूला सरपंच निशांत प्रभुदेसाई व जलपुरवठा खात्याचे अभियंता.
काणकोण ः लोलये पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी बोलविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना उपसभापती इजिदोर फर्नांडिस. बाजूला सरपंच निशांत प्रभुदेसाई व जलपुरवठा खात्याचे अभियंता.
Published on
Updated on

काणकोण
लोलये पंचायत क्षेत्रातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी तीन महिन्यांच्या आत जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या घाला, अशी सूचना उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी जलपुरवठा खात्याच्या अभियंत्यांना केली. 
लोलये पंचायत क्षेत्रातील माशे, दापट, माड्डीतळप व शेळी भागाला दरवर्षी डिसेंबर पासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यावर उपाय योजना करण्यासाठी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आज (मंगळवारी) दापट-माशे येथील गॉड गिफ्टस सभागृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी लोलये-पोळे पंचायतीचे सरपंच निशांत प्रभुदेसाई, उपसरपंच जेसिका कोर्त, पंच सचिन नाईक, जलपुरवठा खात्याचे अधिक्षक अभियंता संजय वाळवेकर, कार्यकारी अभियंता जामदार, सहाय्यक अभियंता लेस्टर फर्नांडिस व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते. 
या भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी दापट येथे जलकुंभ उभारण्यात आला आहे. हा जलकुंभ कार्यन्वित झाल्यानंतर पाणी पुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. या बैठकीला पाणी समस्या भेडसावणाऱ्या भागातील रहिवासी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नाचा भडीमार करून त्यांना भंडावून सोडले. 

संपादन ः संदीप कांबळे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com