Goa Road| टीसीपी दुरुस्ती रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; रेनबो वॉरियर्सचा इशारा

रेनबो वॉरियर्सचा इशारा : मुख्य नगर नियोजकांकडे मागणी
TCP Department
TCP DepartmentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: नगर व शहर नियोजन कायद्यातील दुरुस्ती या खात्याच्या मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जबरदस्तीने करण्यास सांगितली. या दुरुस्तीचा फायदा धनाढ्य व्यावसायिकांना होणार आहे. मुख्य नगर नियोजकांना ही दुरुस्ती रद्द करण्याची विनंती रेनबो वॉरियर्स तसेच लोटली व बेतालभाटीच्या सरपंच आणि पंचांनी केली. ही दुरुस्ती रद्द न झाल्यास गोमंतकीय मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून त्याविरोधात चळवळ उभारतील, असा इशाराही त्यांनी दिला.

(Repeal TCP patch, or else hit streets Rainbow Warriors warn)

TCP Department
Goa Politics| माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची भूमिका; खरी कुजबूज!

रेनबो वॉरियर्सचे अध्यक्ष अभिजीत प्रभुदेसाई यांनी मुख्य नगर नियोजकांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, नगर नियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी शहर व नगर नियोजन कायद्यात अधिकाऱ्यांना जबरदस्तीने

दुरुस्ती करण्यास भाग पाडले आहे. या दुरुस्तीबाबत अधिकारीही काही अंशी सहमत नाहीत, असे त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून दिसते. मंत्र्यांनी ही दुरुस्ती करून याद्वारे अफाट संपत्ती जमवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी उद्योजकांना गोव्यात मोठे प्रकल्प उभारण्याचे आमिष दाखवले आहे. यामुळे राज्यातील बागायती व शेतजमिनींचा वापर गोल्फ, फिल्म सिटी व मोठी हॉटेल्स यासारख्या प्रकल्पांसाठी होईल. मोठमोठे व्यावसायिक गोव्यात जमीन खरेदीसाठी येतील व गोमंतकीयांसाठी जागाच उरणार नाही. गोव्यातील जमिनी पूर्णपणे नष्ट होतील, असे ते म्हणाले.

26 सप्टेंबरपूर्वी पत्रे पाठवा

नगर व शहर नियोजन कायद्यातील दुरुस्तीविरोधात गोमंतकीयांनी २६ सप्टेंबरपूर्वी पत्रे पाठवून आवश्‍यक ती सुधारणा करण्याची मागणी करावी. सरकारने ही दुरुस्ती रद्द न केल्यास गोवा बचाव अभियानप्रमाणे मोठी चळवळ उभारावी लागेल. त्यासाठी गोमंतकीयांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन प्रभुदेसाई यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com