Margao: मडगाव रवींद्र भवनाची 20 दिवसांत दुरुस्ती : गावडे

दोन्ही सांस्कृतिक केंद्रांवर नजर
Don't use Madgaon Ravindra Bhavan for politics
Don't use Madgaon Ravindra Bhavan for politicsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: मडगावचे रवींद्र भवन आणि पणजीची कला अकादमी ही दोन महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यांच्यामुळे आर्थिक स्रोत सुरू राहतो. त्यामुळे आमची या दोन्ही सांस्कृतिक केंद्रांवर नजर आहे. त्यांची वेळोवेळी दुरुस्ती करण्यास प्राधान्य देत आहोत. सध्या रवींद्र भवनमध्ये जी डागडुजी आवश्‍यक आहे, ती तांत्रिक बाब आहे. आमच्या हातातही काही नाही. त्याचसाठी कामाची ऑर्डर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिली आहे.

(Repair of Madgaon Rabindra Bhavan in 20 days says govind Gawde)

Don't use Madgaon Ravindra Bhavan for politics
Goa Road Condition: खांबांवरील रस्‍त्‍याचे बांधकाम अखेर सुरू

कंत्राटदाराने हे काम 15 ते 20 दिवसांत पूर्ण करणार असल्याचे सांगितले असून 25 दिवसांत पूर्ण क्षमतेने रवींद्र भवन पुन्हा सुरू होईल, असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांना सांगितले.

सध्या तियात्र केवळ एका एसी प्लांटवर आणि पंखे लावून सुरू आहेत. 16 ते 18 सप्टेंबरदरम्यान रेम्बो सर्कसचे दर दिवशी चार ते पाच प्रयोग होणार आहेत.

लोकांनी ऑनलाईन पद्धतीने तिकीटे घेतली आहेत. सर्कस मालकाने सभागृहात स्वत:ची वातानुकुलीत व्यवस्था निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com