Drummer William D'souza: प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Drummer William D'souza Died:संगीत क्षेत्राने अष्टपैलू असा वादक गमावला, अशा शब्दांत वैज्ञानिक डॉ. नंदकुमार कामत यांनी भावना व्यक्त केल्या.
प्रसिद्ध गोमंतकीय ड्रमर विलियम यांचे निधन; कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
William D'souza Dainik Gomantak

संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले ड्रमरवादक विलियम डिसोझा हे अन्साभाट, म्हापसा येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. ते ६२ वर्षांचे होते. विलियम फोन उचलत नसल्याने त्यांचा मित्र घरी पोहचला; परंतु दरवाजा उघडत नसल्याने मित्राने पोलिसांशी संपर्क साधला.

कालांतराने पोलिसांनी अग्निशमन दलासोबत विलियम यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता, ते मृतावस्थेत आढळले.

ही घटना मंगळवारी मध्यरात्री १.३०च्या सुमारास उघडकीस आली. ते अविवाहित होते. ते बेडरुमधील पलंगावर निपचित पडलेले होते. मृतदेह कुजल्याने घरात दुर्गंधी येत होती.

गोमेकॉत शवविच्छेदनानंतर पोलिसांनी, याप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त केलेली नाही; परंतु तपास सुरू आहे, असे सांगितले.

विलियम यांचा अशाप्रकारे मृत्यू होणे, ही मनाला चटका लावणारी बाब आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराच्या जाण्याची माहिती कोणालाही नसणे, हे अधिक वेदनादायी आहे.

संगीत क्षेत्राने अष्टपैलू असा वादक गमावला, अशा शब्दांत वैज्ञानिक डॉ. नंदकुमार कामत यांनी भावना व्यक्त केल्या. विलियम यांचा एकाकी अवस्थेत मृत्यू झाला. ते नावाजलेले ड्रमर होते. गोव्यासह परराज्यांतही त्यांची प्रचंड ख्याती होती.

कामत म्हणाले की, विलियम हे साधे-सरळ तसेच संगीत क्षेत्रातील दिग्गज नाव. ते मितभाषी आणि सदगृहस्थ होते. पोलिसांकडून वयोवृद्ध व ज्येष्ठांसाठी संवाद कार्यक्रम राबविले जातात खरे; परंतु ग्राउंड रिअ‍ॅलीटी वेगळीच आहे, असे कामत म्हणाले.

म्हापसा पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक परेश नाईक असताना पोलिसांकडून बऱ्यापैकी सहकार्य मिळायचे. आता परेश यांची कळंगुटला बदली झाली. त्यानंतर पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत कामत यांनी व्यक्त केली.

मी ज्या ठिकाणी राहतो, तिथे पोलिसांची रात्री क्वचितच गस्त असते. पोलिस स्थानकातील लँडलाईन फोन अनेकदा बंदच असतो. पोलिसांकडून कंटाळवाणी उत्तरे मिळतात, परिणामी चीडचीड होते, असा दावा कामत यांनी केला.

यंत्रणेकडून दखल नाहीच!

- विलियम हे नावाजलेले ड्रमवादक होते. ते घरी एकटेच राहायचे. अशावेळी पोलिसांनी त्यांची कितीदा विचारपूस केली, हा प्रश्नच आहे.

- कुजलेल्या अवस्थेत कलाकाराचा मृतदेह सापडणे, यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही. सरकारने देखील विलीयम यांच्या प्रतिभेचा आवश्यक असा फायदा करून घेतला नाही.

- कलाकारांसाठी सध्या आंदोलन सुरू आहे; परंतु एकाकी कलाकारांचा आवाज कोण बनणार, असा प्रश्न डॉ. कामत यांनी उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com