Colvale: कोणीवाडा शाळेला नवे स्‍वरूप; सीसीटीव्ही कॅमेरे, उत्तम बाक, वॉशरुम

Government Primary School Koniwada: ग्लेनमार्क फाऊंडेशनने सीएसआर निधीअंतर्गत कोणीवाडा-कोलवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले
Government Primary School Koniwada: ग्लेनमार्क फाऊंडेशनने सीएसआर निधीअंतर्गत कोणीवाडा-कोलवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले
Government Primary School KoniwadaDainik Gomantak
Published on
Updated on

चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुधारण्याच्या उद्देशाने ग्लेनमार्क फाऊंडेशनने सीएसआर निधीअंतर्गत कोणीवाडा-कोलवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले. आता मुलांना शाळेमध्ये बसण्यासाठी उत्तम बाक, वॉशरुम, खेळण्याची जागा तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्‍यात आले आहेत.

Government Primary School Koniwada: ग्लेनमार्क फाऊंडेशनने सीएसआर निधीअंतर्गत कोणीवाडा-कोलवाळ येथील सरकारी प्राथमिक शाळेचे नूतनीकरण केले
Goa English Medium Schools: इंग्रजी शाळांना मान्यता नाही! कोकणी भाषा मंडळाच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

यावेळी ग्लेनमार्क फाऊंडेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष परीन दशोत्तर म्हणाले की, माणसाच्या जीवनात शिक्षण हे अतिशय महत्त्‍वाचे आहे आणि ते शाळेतच मिळते. याच भावनेतून या शाळेमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आम्ही सीएसआरअंतर्गत विविध कामे हाती घेतली आहेत. हे आमचे सर्वोत्तम काम आहे. कोणीवाडा येथील नूतनीकरण केलेल्या सरकारी प्राथमिक विद्यालयाचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी गावचे सरपंच दशरथ बिचोलकर, पंच रितेश वारखंडकर, फाऊंडेशनचे रोहित गुप्ता, बाळकृष्ण कामत, राज वैद्य, भिकाजी साळगावकर, वैष्णव सावळ, मुख्याध्यापिका नूतन सावंत व पालक उपस्थित होते.

नवीन बाक, खेळण्याची साधने, पटांगण, वॉटर फिल्टर आणि खूप काही...

या सरकारी शाळेच्या इमारतीमधील अंगणवाडीमध्येही आवश्‍‍यक सुविधा निर्माण करून देण्‍यात आल्‍या आहेत. ग्लेन मार्क फाऊंडेशनने दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पायाभूत सुविधांमध्ये उन्नती साधली आहे. नवीन बाक, सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंतीचे नूतनीकरण, वर्ग खोल्यांची दुरुस्ती, रंगकाम, स्वच्छतागृह, खेळण्याची साधने, पटांगण, वॉटर फिल्टर अशा सुविधा आता विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

गावात तीन सरकारी शाळा होत्या. त्यातील एक बंद आहे. उर्वरित दोनपैकी या कोणीवाड्यावरील शाळेत सर्वाधिक विद्यार्थी आहेत. आता शाळेचे नूतनीकरण करण्‍यात आल्‍यामुळे पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास आनंद होईल. ग्लेनमार्क फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्‍पद आहे.

दशरथ बिचोलकर, सरपंच

या सरकारी प्राथमिक शाळेचे नूतनीकरण व्हावे हे माझे स्वप्न होते व ते ग्लेनमार्क फाऊंडेशनतर्फे सत्यात उतरले आहे. फाऊंडेशनने १५ लाख रूपये खर्चून पायाभूत सुविधा उपलब्ध करून शाळेचा दर्जा उंचावला आहे. त्‍यामुळे मुलांना आता चांगल्या वातावरणात चांगले शिक्षण मिळणार आहे.

रितेश वारखंडकर, पंचसदस्‍य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com