Renovate Home In Monsoon: गावागावांत घर शाकारणीला आला वेग

उष्म्यापासून बचाव मिळणारा नैसर्गिक गारवा
Home Renovation
Home Renovation Gomantak Digital Team

Home Renovation Before Monsoon: पावसाळा जवळ आल्याने मान्सूनपूर्व कामांना आता ग्रामीण भागातही वेग आला आहे.

पावसाळ्यापूर्वी छताचे नळे परतणे, छपराचे वासे किंवा इतर साहित्य खराब झाले असेल तर ते बदलणे, पावसाचे पाणी घरात येणार नाही याची काळजी घेणे, यासाठी योग्य ती डागडुजी करावी लागते. त्याची लगबग सध्या सुरू आहे.

आता गावागावांत नळ्यांची घरे कमी होऊन त्याजागी स्लॅबच्या इमारती होऊ लागल्याने घर परतविण्यासाठी लागणारे कारागीर, कामगार मिळणे कठीण होत चालले आहे. परंतु आजही काही ग्रामस्थ ही कामे अतिशय उत्तम प्रकारे करत आहेत.

Home Renovation
Panaji News : विंडो पेन ओयस्टरचे संरक्षण ही काळाची गरज : इंगोले

नळ्यांच्या घरात उष्म्यापासून बचाव होऊन मिळणारा नैसर्गिक गारवा आजही अनेकांना भुरळ पाडतो. नळ्याच्या घराची काळजी कायमस्वरूपी घ्यावी लागते. किमान दोन-तीन वर्षांनी एकदा छपराची डागडुजी करून घ्यावी लागते.

Home Renovation
Panaji News : सांताक्रुझमध्ये खोदाई; डांबरीकरणाकडे दुर्लक्ष

छपराची डागडुजी वारंवार करावी लागत असल्याने तसेच लाकूड साहित्याच्या किमती गगनाला भिडल्याने आता नव्याने कोणीही नळ्याची घरे बांधत नाहीत. त्याऐवजी सिमेंट किंवा लोखंडी पत्र्यांनी छपराची जागा घेतली आहे. काही वर्षांनी ग्रामीण भागात देखील नळ्याची घरे सापडणे कठीण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com