Religion Conversion : इजिप्तमध्ये नेऊन नोकरीच्या बहाण्याने धर्मांतराचा प्रयत्न

जामीन नाकारला ः पाचपैकी तिघेजण अजूनही विदेशात
Religion Conversion
Religion ConversionDainik Gomantak

Religion Conversion : मडगाव, गोव्यातील व्यक्तीला नोकरी देण्याचे आश्वासन देत इस्राईलऐवजी इजिप्तमध्ये नेले व तिथे मुस्लिम धर्म स्वीकारल्यास दुसऱ्या देशात येणे-जाणे सोपे होईल, असे सांगत दोघा संशयितांनी पीडित व्यक्तीवर दबाव टाकल्याचा आरोप असलेला मुख्य संशयित जेराल्ड डिसोझा याने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज मडगाव येथील सत्र न्यायालयाने फेटाळला.

या प्रकरणात एकूण पाच संशयित असून त्यातील तिघे अजूनही परदेशात आहेत.दरम्यान, या अर्जाला विरोध करताना सरकारी वकील व्ही.जी.कोस्टा यांनी युक्तिवादात सांगितले,की संशयित जेराल्डने कोणताही परवाना नसताना परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने विविध भागातील २१ जणांची फसवणूक करून लाखोंचा गंडा घातला.

त्यातून त्याने बंगला खरेदी केला. परदेशात नोकरी लावण्यासाठी आवश्यक परवाना नसतानाही चुकीची माहिती देऊन फसवणूक केली.

नोकरी देण्याच्या बहाण्याने इस्राईलला नेण्याचे आश्वासन देत इजिप्तला नेले व नोकरी न देता आर्थिक फसवणूकही झाल्याची तक्रार पीडित आंतानिओ कार्दाेज यांनी २०२१ मध्ये केलेली होती.

या प्रकरणात जेराल्ड डिसोझा, आंतोनिओ, मेलविन, सय्यद व फरहाज अशी पाच संशयितांची नावे होती. मडगाव पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी तपास करत मुख्य संशयित जेराल्डचा पत्ता शोधून त्याला ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठवली होती. याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित जेराल्डने दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला व तो फेटाळताना न्यायालयाने दिलेल्या कारणांतून केवळ आर्थिक फसवणूकच नाही तर धर्म परिवर्तनाचा प्रयत्नही याप्रकरणातील दोघा संशयितांकडून झाल्याचे समोर आले.

Religion Conversion
Goa Forward Party च्या प्रयत्नांमुळेच मानवाधिकार आयोगाचे पुनर्गठन; दुर्गादास कामत यांचा दावा

फसवणूक झाल्यावर महिनाभर पैशांची जुळवाजुळव करत पीडित व्यक्तीने गोवा गाठला. आंतोनिओ यांच्या तक्रारीनंतर डिसोझासह इतर ५ जणांवर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने संशयित डिसोझा व इतरांनी अनेकांना गंडा घातला आहे.

शैलेश नाईककडून साडेपाच लाख, जॉन एडविन फुर्तादोकडून ७.६० लाख, आंतोनिओ कार्दाेजकडून ४.७० लाखांची रक्कम घेतली आहे. मात्र, देताना खूपच थोडी रक्कम परत केली आहे.

मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव

पीडित व्यक्तीला इस्राईलला नोकरीसाठी नेण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्याच्या सहकाऱ्यांनी पीडित तरुणाला इजिप्तला नेले. तिथे त्याची राहण्याची सोय केली नाही.

याशिवाय मुस्लिम धर्म स्वीकारल्यास इजिप्तमधून इस्राईलला जाणे सोपे होईल, असे सांगत त्याच्यावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबावही टाकला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com