कंत्राटदाराकडून म्हापसा बाजारात मनमानी

कचरा शुल्काची पाच रुपयांची पावती देऊन 50 रुपये वसूल
Recovered Rs 50 by giving receipt of Rs 5 for waste charges in mapusa
Recovered Rs 50 by giving receipt of Rs 5 for waste charges in mapusaDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा : म्हापसा (Mapusa Market) बाजारपेठेतील सोपो कर कंत्राटदाराचा मनमानी कारभार चालला आहे. केवळ सोपो कर गोळा (Tax recovery) करण्याचा अधिकार असतानाही कचरा शुल्काची केवळ पाच रुपयांची पावती देऊन 50 रुपये विक्रेत्यांकडून वसूल केले जात आहेत, असा आरोप म्हापसा पीपल्स युनियनने केला आहे.

Recovered Rs 50 by giving receipt of Rs 5 for waste charges in mapusa
Goa Politics: युतीच्या शक्यतेला राज्यात पुन्हा चालना

बाजारपेठेत शेडखाली असलेल्या विक्रेत्यांकडून वीस रुपये तर शेड नसलेल्या ठिकाणी दहा रुपये असे पालिकेचे शुल्क असताना सोपोच्या पावतीवर शुल्क न लिहिता मासळी बाजारात विक्रेत्यांकडून जास्त रक्कम वसुली केली जात असल्याचा आरोप म्हापसा पीपल्स युनियनचे पदाधिकारी जवाहरलाल शेट्ये आणि सुदेश तिवरेकर यांनी केला. शेट्ये आणि तिवरेकर यांनी मंगळवारी दुपारी पालिकेचे बाजारपेठ निरीक्षक नरसिंह राठवड यांची भेट घेऊन सोपो कर कंत्राटदाराकडून होणारी मनमानी त्यांच्या नजरेस आणून दिली. बाजारपेठेत ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना लक्ष ठेवण्याची सूचनाही केली. तसेच चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन राठवड यांनी दिल्याचे तिवरेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com