Goa Monsoon: पावसाचे १२३ वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक! वाळपई, सांगेत २०० इंचांचा टप्पा पार

Goa Rain: राज्यात आतापर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४५.९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे
Goa Rain: राज्यात आतापर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४५.९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे
Goa WeatherCanva
Published on
Updated on

Record Break Rain At Goa

पणजी: राज्यात यंदा पावसाने जोरदार फटकेबाजी करत नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता पावसाने मागील १२३ वर्षांचे रेकॉर्ड मोडीत काढत राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२० साली राज्यात ४२०३.७ मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती, त्याहीपेक्षा अधिक म्हणजेच ४२०८.२ मिमी म्हणजेच १६५.६७ इंच पावसाची नोंद करण्यात आली असून पावसाळ्याचे अजून १३ दिवस बाकी असतानाच हा विक्रम घडला आहे. यंदा जुलै महिन्यात मागील १२३ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. ७ जुलै रोजी २३६ मिमी म्हणजेच तब्बल ९.२९ इंच इतक्या सरासरी पावसाची नोंद करण्यात आली.

Goa Rain: राज्यात आतापर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४५.९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे
Goa Monsoon:...गोमंतकीयांच्या काळजात पुन्‍हा धस्‍स! झाडे पडली, मांडव कोसळला, घरांमध्ये पाणी

कमी काळात मुबलक पर्जन्यवृष्टी

मागील चार-पाच दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे; परंतु राज्यात आतापर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत तब्बल ४५.९ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा देखील एक प्रकारे विक्रम म्हणता येईल तसेच कमी काळात अधिक पाऊस पडण्याची घटना देखील यंदाच्या पावसात घडली. त्यामुळे सर्वार्थाने हा पाऊस निराळाच ठरला आहे.

वाळपईत सर्वाधिक २१४.११ इंच पावसाची नोंद

दाबोळीत सर्वांत कमी१३०.३३ इंच पावसाची नोंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com