Rice Farm
Rice FarmDainik Gomantak

काणकोणात वायंगण शेतीत भात कापणीस तयार

शेतकऱ्यांना दिलासा: अवकाळी पावसामुळे लागवडीला उशीर; तरीही पीक तरले
Published on

काणकोण: काणकोणात वायंगण शेतीत भाताची कणसे पिकू लागली आहेत. येत्या पंधरा दिवसांत भात शेती कापणीस तयार होणार आहे. यंदा अवकाळी पावसामुळे वायंगण शेतीच्या लागवडीस उशीर झाला होता.त्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या काळात शेती पाण्याविना करपून जाण्याची भीती होती तरी यंदा त्यामानाने वायंगण शेतीला पाण्याची कमतरता भासली नाही. तरीही बदलत्या वातावरणाचा परिणाम पिकावर झाला आहे, असे लोलये येथील विलास अय्या यांनी सांगितले.

Rice Farm
हणजूणमध्ये 3 लाखांचे ड्रग्ज जप्त; जपानी नागरिकास अटक

यंदा कधी नव्हे एवढ्या प्रमाणात बदलत्या वातावरणाचा परिणाम सर्व काजू,आंबा,फणस या फळ पिकांबरोबरच,भाजी पिकांवर झाला आहे.अवकाळी पावसामुळे फळधारणा उशिरा झाली.दमट हवामानाचा काजू पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामानाने बदलत्या वातावरणाचा परिणाम वायंगण भातपिकावर कमी प्रमाणात झाला आहे. ब्लॅक राईस ही पौष्टीक भात जात आहे.या जातीचे तांदूळ 200 रूपये प्रति किलो दराने बाजारात विकले जातात. काणकोणमधील वातावरण या वाणासाठी पोषक असल्याचे विभागीय कृषी अधिकारी कीर्तीराज नाईक गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com