
Mumbai Goa Highway
वास्को: "मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण ही गोव्याची हार्टलाईन आहे. या महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्रात अनेक अडचणी आल्या. आता जवळपास याचे काम संपृष्टात येत आहे. जूनपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही देण्यात आली होती पण, यात अनेक अडचणी आल्या. पुढील तीन ते चार महिन्यात मुंबई ते गोवा महामार्ग पूर्णपणे वाहतुकीस सुरु होईल. यानंतर जास्तीत जास्त ५ ते ६ तासांत मुंबईवरुन गोव्याला पोहोचता येईल," असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
"यात गोव्यात तीन पॅकेज होती, ३६ किलोमीटरसाठी २५२१ कोटी रुपये किंमत होती. १२४ पैकी ७५ किलोमीटर लांबी पूर्ण झालीय. ५ किलोमीटर प्रगतीपथावर आहे. आणि उर्वरीत ३६ किलोमीटरमध्ये चौपदरीकरणाचे तीन पॅकेज पूर्ण झालीयेत. सुदीन ढवळीकर बांधकाम मंत्री असताना त्यांना कल्पना आहे की जमीन अधीग्रहण करताना खूप अडचणी आल्या. काही प्रकरणे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली. पण, सर्व अडचणींवर मात करुन हे काम सुरु आहे," असे नितीन गडकरी म्हणाले.
"दक्षिणेत जाणाऱ्या लोकांना गोव्यातून जाण्याऐवजी त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिल्यास राज्यातील वाहतूक कोंडी कमी होईल, असा विचार समोर आला. महाराष्ट्रातून गोव्यात येताना पत्रादेवी सीमेवरुन थेट बंगळुरु येथे जाण्यासाठी रिंगरोड तयार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री सांवत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केली आहे.
या प्रकल्पाबाबत सध्या सविस्तर अभ्यास केला जात आहे. यानंतर लवकरच राज्यात १२ ते १५ हजार कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरु होईल, हे काम पूर्ण झाले की गोव्यातील जवळपास सर्व कामे संपतील," असे गडकरी म्हणाले.
पत्रादेवी येथून बंगळुरुला जोडणाऱ्या रिंगरोडसाठी अलायन्मेट गुप्त ठेवली आहे. अलायन्मेट दाखवल्यानंतरची तुम्ही झोन घोषित करा, असा सल्ला नितीन गडकरींनी दिला. अनेकजण अयायन्मेट पाहून जमीन खरेदी करतात, असा अमचा अनुभव आहे. मी गोव्याबाबत बोलत नाही पण, चुकून टोपी फिट बसली असेल तर माफ करा, असे गडकरी म्हणाले. १२ ते १५ हजार कोटी रुपये खर्च करुन उभारल्या जाणाऱ्या या रिंगरोडचा फायदा गोवा सरकारने घ्यावा, असेही गडकरी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.