Who After Ravi Naik: रवींनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Ravi Naik: फोंडा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत रवींच्या दोन्ही पुत्रांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाच्या नेत्यांनी अंत्यसंस्कारावेळी जाहीरपणे केली आहे.
ravi naik funeral
ravi naik funeralDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिवंगत मंत्री रवी नाईक यांच्या अस्थींचा कलश तालुकावार दर्शनासाठी ठेवण्याचे नियोजन त्यांच्या हितचिंतकांकडून केले जात आहे. त्याशिवाय अनेक ठिकाणी शोकसभाही होणार आहेत. रवींचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव निर्माण करण्याकरीता हे पाऊल टाकण्यात येत आहे.

फोंडा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत रवींच्या दोन्ही पुत्रांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी गोमंतक भंडारी समाजाच्या नेत्यांनी अंत्यसंस्कारावेळी जाहीरपणे केली आहे. भाजपशी विधानसभा निवडणुकीनंतर युती केलेल्या मगोपच्या नेत्यांनी आम्ही युती धर्म निभावू, असे सांगत रवी नाईक यांच्या पुत्राला उमेदवारी दिल्यास मगोपचा पाठिंबा असेल, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे फोंड्यातून रवी यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यासाठी भाजपवर दबाव वाढविला जात आहे.

नव्या नेतृत्वासाठी चाचपणी सुरू

दुसरीकडे भंडारी समाज एकसंघ रहावा, असा विचार रवी यांनी हरवळे येथे श्री देव रूद्रेश्वराच्या साक्षीने मांडला होता. त्यामुळे समाजाचे एकीकरण हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा विचार पुढे करून त्यांचे अस्थिकलश तालुकावार दर्शनासाठी ठेवण्याचे नियोजन करणे सुरू केले आहे. त्यामुळे सध्या मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या समाजात पुन्हा संघटितपणे पुढे आणण्‍यासाठी राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोणते असू शकेल, अशी चाचपणीही समाजाच्या पातळीवर सुरू झाली आहे.

भाजपची सावध भूमिका

या सगळ्या घडामोडींवर अर्थातच सत्ताधारी भाजपची नजर आहे. त्यांना रवी यांच्या ताकदीचा अंदाज होता. मात्र, आता त्यांच्या मागे समाजाकडून किती ताकद उभी केली जाते, यावर बरेच काही अवलंबून आहे. मंत्रिमंडळातील रिक्त जागेवर तूर्त सहा महिन्यांसाठी रवी पुत्राची वर्णी लावावी, इथपासून फोंड्याची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशा नानाविध सूचना केल्या जात आहेत. त्याकडे भाजपने सजगपणे पाहणे सुरू केले आहे. त्यामुळे या विषयावर कोणत्याही भाजप नेत्याने वक्तव्य करू नये, असे ठरविण्यात आले आहे.

ravi naik funeral
Ravi Naik Political Career: नगरसेवक ते मुख्यमंत्री...गोव्याच्या राजकारणातील 'दीपस्तंभ' रवि नाईक, वाचा त्यांची राजकीय कारकीर्द

मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

फोंड्यातील पोटनिवडणूक पुढील वर्षी मार्चमध्ये होईल, असे सत्ताधारी वर्तुळातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे तोवर मोठा निर्णय घेण्याची घाई करायची नाही, असे प्रदेश पातळीवर भाजपने ठरवले असले तरी बरेच काही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या आदेशावर अवलंबून आहे. स्व. रवी यांचे राजकीय वजन किती, यावरच हे निर्णय अवलंबून असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले.

ravi naik funeral
Ravi Naik: गोंयचो पात्रांव अनंतांन विलीन! रवी नाईक यांना 21 बंदुकींच्या सलामीसह अखेरचा निरोप

मंत्रिपदाबाबत भाजपचे निकषांना प्राधान्य

१ रवी यांच्याकडील सर्व खाती त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांकडे आली आहेत. ती अन्य कोणत्‍या मंत्र्याला तूर्त दिली जाणार नाहीत. यातून रवी यांच्या वारसदाराकडे ती देण्यासाठी राखून ठेवण्यात येत असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

२ असे असले तरी पहिल्यांदाच रवी पुत्राने विधानसभेत पाय ठेवला तरी मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. उमेदवारी, मंत्रिपद यासाठी भाजपचे काही निकष आहेत. त्यांची पूर्तता केल्यानंतरच त्यासाठी विचार केला जाणार आहे.

फोंड्यात मगोप युतीचा धर्म निभावेल. त्याबाबत मगोप केंद्रीय समितीत निर्णय घेणार आहे. मगोपने जनभावनांची दखल घेतली आहे. पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार कार्यवाही होईल.

सुदिन ढवळीकर, मगोचे ज्‍येष्‍ठ नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com