Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण

Konkan Railway : २५ केव्हीचा वीजप्रवाहही सुरू
Konkan Railways
Konkan RailwaysDainik Gomantak
Published on
Updated on

रत्नागिरी : गेल्या सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावरील सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अखेर पुर्ण झाले आहे. या मार्गावरील विद्युतीकरण पूर्ण झाल्याने कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व सुरु होणार आहे. (Ratnagiri Thevi Railway Electrification Work Completed)

कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून २५ केव्हीचा वीजप्रवाहही सुरू करण्यात आलेला आहे. रत्नागिरी ते थिवी (Thevi) मार्गावरील विद्युतीकरणाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांच्या नेतृत्वाखाली पथकाद्वारे करण्यात येत आहे.

Konkan Railways
बीचवरील मद्यपानामुळे लाईफगार्ड्सच्या डोक्याला ताप

दरम्यान गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी तपासणी केली होती. त्याआधी कारवार-ठोकूर तसेच रोहा-रत्नागिरी विद्युतीकरण टप्पे पूर्ण केले गेले. तेथील सीआरएस निरीक्षणदेखील पूर्ण झाले आहे. मुंबईपासून (Mumbai) रत्नागिरीपर्यंतचा (Ratnagiri) सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जाते.

रत्नागिरी ते थिवी मार्गावर विद्युत रेल्वे (Railway) धावण्याचा मार्ग मोकळा झाल्याने अंतिम टप्प्यातील सीआरएस तपासणीनंतर कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग हा डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर धावण्यासाठी सज्ज होणार आहे. त्यामुळे वर्षाकाठी डिझेलवर (Diesel) होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल. तसेच, धुरामुळे होणार प्रदूषण देखील टाळता येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com