ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ नाईक यांचे निधन

मराठीला राजभाषा करण्यासाठी पुकारलेल्या विविध आंदोलनांत सहभागी झालेल्या नाईक यांना अनेक मराठीप्रेमी व साहित्यिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
Ramnath Naik
Ramnath NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: जाज्वल्य मराठीप्रेमी तसेच साहित्यिक रामनाथ ग. नाईक (वय 71) यांचे मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन कन्या, पुत्र असा परिवार आहे. बुधवारी दुपारी फोंड्यातील (Phonda) मुक्तीधाम स्मशानभूमीत त्यांचे पुत्र अजिंक्य यांनी अंत्यसंस्कार केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (Ramnath Naik passess way in Goa)

Ramnath Naik
पत्नीला उमेदवारी नाकारली म्हणून मी भाजपवर नाराज नाही: बाबू कवळेकर

मराठीला राजभाषा करण्यासाठी पुकारलेल्या विविध आंदोलनांत सहभागी झालेल्या नाईक यांना अनेक मराठीप्रेमी व साहित्यिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. मूळ उंडिर - बांदोडा पण सध्या फोंडा येथे त्यांचे वास्तव्य होते. नाईक यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेक दैनिकांतून लिखाण केले. आतापर्यंत त्यांची तीन पुस्तके (Books) प्रकाशित झाली आहेत. गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. या काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी आग्रह धरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com