पणजी : गोवा मुक्ती लढ्यात अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेले स्वातंत्र्य सैनिक रामदासभाऊ चाफाडकर (87) यांनी शनिवारी अखरेचा श्वास घेतला.
मुख्यमंत्री (CM) डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पोर्तुगीजांविरोधात झालेल्या सशस्त्र कारवाईत त्यांचा सक्रिय सहभाग होता. स्वा.सै.मोहन रानडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गोवा (goa) मुक्ती लढ्यात दिलेले योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रामदास चाफाडकर म्हणजेच दासू चाफाडकर यांनी मुक्ती लढ्यात दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1935 मध्ये झाला होता. सातवीपर्यंत मोहन रानडे यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पूर्णपणे गोवा मुक्तीलढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. ते आझाद गोमंतक दलाचे कार्यकर्ते म्हणून काम करताना ते क्रांती नावाची पत्रके छापून लोकांना वाटत होते, तसेच ते पोर्तुगीजांविरोधात (Portuguese) सशस्त्र हल्ल्यात अग्रेसर होते. 1 जानेवारी 1955 रोजी मोहन रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली त्यांनी बाणस्तारी पोलिस (police) चौकीवर हल्ला चढविला होता. चळवळीसाठी शस्त्रे मिळविणे हा त्यांचा उद्देश होता. दुसरा हल्ला त्यांनी हळदोणे पोलिस चौकीवर केला होता, तेव्हा त्यांच्या पायाला गोळी लागली होती.
त्यांना 9 ऑगस्ट 1955 मध्ये अटक केली व 22 वर्षे कारावासाची सजा दिली. कारावास संपल्यानंतर ते हिंदी शिक्षक म्हणून उत्कर्ष विद्यालय, सावईवेरे येथे अध्यापन करत होते. 15 ऑगस्ट 1972 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना ताम्रपट बहाल केले. 5 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीत राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.