Ramakant Khalap: ''गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावलं, पण अजूनही गोमंतकीयांना...''; खलप पुन्हा एकदा बरसले

गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावले, परंतु लोकांनाही अजूनही जमिनीचा मालकीहक्क मिळालेला नाही.
Ramakant Khalap
Ramakant KhalapDainik Gomantak

Ramakant Khalap: गोव्‍यातून पोर्तुगिजांना हाकलून लावले, परंतु लोकांनाही अजूनही जमिनीचा मालकीहक्क मिळालेला नाही. मालकालाच आपली जमीन का मिळत नाही? असा सवाल ‘इंडिया’ आघाडीचे उत्तरेतील उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केला.

पोर्तुगिजांना हाकलून लावण्याचा हेतू काय होता? आपलेच लोक आपल्या जमिनीचे भागीदार का होऊ शकत नाहीत? मी मांद्रेमध्ये सायबर सिटी प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा जमीन विकली जाणार नव्हती, असे खलप म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूसंपादनाच्या तुटपुंज्या मोबदल्याविरोधात आंदोलन केले. अखेर सरकारला कायद्यात बदल करून जमिनीच्या बाजारभावाच्या तिप्पट मोबदला द्यावा लागला होता, याचे स्‍मरण खलप यांनी करून दिले. यावेळी हळदोणेचे काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा हेही उपस्‍थित होते. ते म्‍हणाले, आमच्या टेकड्या बिल्डरांना बेसुमार विकल्या जात आहेत. या बेकायदेशीरपणाच्या विरोधात मी लढा देत आहे. गोवा वाचवण्याची वेळ आली आहे आणि ते प्रत्‍येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे.

Ramakant Khalap
CM Sawant Vs Khalap: तर म्हापसा अर्बनची फाईल पुन्हा उघडू; CM सावंतांचा नाव न घेता खलपांना गर्भित इशारा

कार्लुस फेरेरा, आमदार (हळदोणे)

म्हादई, कोळसा, रेल्वे डबल ट्रॅकिंग, जंगल नष्ट करण्यासाठी तम्‍नार वीज प्रकल्प आदी जनताविरोधी व पर्यावरणविरोधी कामे सरकार करत आहे. ब्रिटिश राजवटीत ईस्ट इंडिया कंपनी जशी देश चालवत होती, तसेच आज सरकारचे बहुराष्ट्रीय मित्रमंडळ देशातील बंदरे, विमानतळे, कोळसा व्यवसाय, मोबाईल, दळणवळण, वीज इत्यादी चालवत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com