
पणजी: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचे शुक्रवारी राजधानीत तीव्र पडसाद उमटले. निषेधार्थ मोर्चा निघाला, चक्काजाम झाला. मुख्य सूत्रधारास सोमवारपर्यंत अटक करा अन्यथा गोवा बंद करू, असा इशारा आंदोलकांनी दिला.
आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी भेटण्याची मागणी केली, त्यानुसार मुख्यमंत्री सावंत यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पाच मागण्या ठेवण्यात. त्यानंतर सावंत यांची गोमेकॉत जात काणकोणकर यांची विचारपूस केली. गुन्हेगाराना हद्दपार करण्याचीही त्यांनी ग्वाही दिली. संध्याकाळी सहाव्या संशयितास कळंगुट येथून जेरबंद करण्यात आले. त्यानंतर सातव्या संशयितासही अटक करण्यात आली.
सकाळी अकरा वाजता आझाद मैदानापासून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद राजधानीत सर्वत्र दिसून आले. रस्त्यावर चक्का जाम होण्याच्या घटनेने जनतेतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी वाहनधारकांनी सामंजस्यपणा दाखवत आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनास मूक पाठिंबा दर्शविल्याचे दिसून आले.
आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सायंकाळी गोमेकॉत जाऊन काणकोणकर यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी काणकोणकरला गोमेकॉत आणि त्यांच्या घरीही पोलिस संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिले. तत्पूर्वी महालक्ष्मी बंगल्यात शिष्टमंडळाबरोबर झालेल्या बैठकीत या घटनेचा सर्व तपास करून संशयितांना तडीपार केले जाईल, असेही सावंत यांनी सांगितले.
आंदोलनकर्ते भाजप कार्यालयापासून चर्च स्क्वेअरकडे गेल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या कार्यालयापर्यंत धाव घेतली, परंतु कार्यालयाचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने त्यांना माघारी परतावे लागले.
रामा काणेकोणकर यांच्या आरोग्याची स्थिती सध्या गंभीर आहे. त्यांना मुका मार लागल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टरांनी विश्रांतीची गरज असल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना देखील भेटणे शक्य होत नाही. रामा काणकोणकर बोलण्याच्या स्थितीत नाहीत. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, काणकोणकर यांना केबलने मारहाण केली असून केबल आणि ज्या मोबाईलने व्हिडिओ काढला तो मोबाईल देखील जप्त करण्यात येईल. तसेच यासाठी वापरण्यात आलेली गाडी आम्ही लवकरच जप्त करणार आहोत.
भाजपच्या कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनाबाबत भाजपने ट्विट केल्याने पक्षाच्या विचारसरणीशी सहमत असलेले लोक या संदेशाचे समर्थन करू लागले. हे ट्विट राजकीय हिंसाचार व गोंधळाविरोधात ठामपणे आवाज उठवते असे मत भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. “गोव्यातील ४ लाखांचे कुटुंब आणि भारतभरातील १४ कोटींचा परिवार” असल्याचे भाजपने सांगितल्याने विरोधकांना जबाबदारीने वागण्याचा इशारा देणारे हे वक्तव्य असल्याचे मत समर्थकांनी व्यक्त केले. “अपयशी राजकीय पक्षाचे काही मोजके सदस्य” किंवा “प्रसिद्धीसाठी केलेली धडपड” असे शब्द ट्विटमध्ये वापरल्याने विरोधकांना भाजप कमी लेखत असून भाजप अप्रत्यक्षपणे इशारा देत असल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या.
अटक केलेल्या गुन्हेगारांवर एनएसए कायद्याने कारवाई करावी
गुन्हेगारांशी असलेल्या राजकीय संबंधाविरोधात कृती दल नेमावे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.