Ram Navami 2024 : रामजन्मोत्सव भक्तिभावाने साजरा; राज्यात आनंदोत्सव

Ram Navami 2024 : राज्यात यंदा पहिल्यांदा गोवा सरकारद्वारे रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. राज्यात अतिशय भक्तिभावात तसेच जल्लोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
Ram Navami 2024
Ram Navami 2024 Dainik Gomantak

Ram Navami 2024 :

पणजी, राज्यात बुधवारी श्रीराम नवमीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील प्रत्येक गावात तसेच प्रमुख मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.

राज्यात यंदा पहिल्यांदा गोवा सरकारद्वारे रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने अनेक नागरिकांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. राज्यात अतिशय भक्तिभावात तसेच जल्लोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

राज्यातील श्रीराम मंदिर, श्री हनुमान मंदिर तसेच इतर गावांतील प्रमुख मंदिरांमध्ये सकाळपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी अभिषेक, पूजा, तसेच इतर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले.

रामजन्मोत्सवाच्या अनुषंगाने राज्यातील बहुतांशी मंदिरांमध्ये रामजन्मोत्सवाची महती सांगणाऱ्या कीर्तनांचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ नंतर रामजन्मोत्सव तसेच पाळणा गीत गात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. राज्यातील अनेक मंदिरांमध्ये दुपारी महाप्रसादाचे आयोजनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते.

मंदिरात उपस्थित भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. पणजी महालक्ष्मी मंदिरात अयोध्येतील श्रीराम मंदिरात साजरी करण्यात येत असलेल्या श्रीरामजन्मोत्सव प्रोजेक्टरच्या साहाय्याने थेट प्रक्षेपण मंदिरात उपस्थित रामभक्तांना दाखविण्यात आले.

सायंकाळी अनेक मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, सांगीतिक कार्यक्रम, मराठी, कोकणी नाट्यप्रयोगांचे देखील आयोजन करण्यात आले होते. राज्यातील नागरिकांनी उत्साहात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेत मोठ्या आनंदात रामजन्मोत्सव साजरा केला.

Ram Navami 2024
Goa Traffic Police: गोवा वाहतूक पोलिसांची धडक कारवाई! कदंब बसचालकासह 35 मद्यपींवर कारवाई

सांस्कृतिक कार्यक्रम

पणजीतील भाटले येथील श्रीराम मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, साई मंदिर, तसेच राज्यातील श्रीराम मंदिर तसेच प्रमुख संस्थानांत मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे करण्यात आले. काही मंदिरांमध्ये विशेषतः राम मंदिरामध्ये पुढील दोन-तीन दिवस धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रामजन्मोत्सवानिमित्त अनेक मंदिरे पुष्पांच्या तोरणांनी तसेच विद्युत रोषणाईने देखील सजविण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com