Goa Forest Fire: गोव्यात जंगलातील आगीने किती जंगल झाले खाक? राज्यसभेतील उत्तरातून समोर आली माहिती...

खासदार लुईझीन फालेरो यांनी विचारला होता प्रश्न
Goa Forest Fire
Goa Forest FireDainik Gomantak

Goa Forest Fire: गोव्यात अलीकडच्या काळात जंगलात आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या आगीमध्ये एकूण जवळपास 4.18 चौरस किलोमीटर वनक्षेत्र खाक झाले आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी गुरुवारी राज्यसभेत खासदार लुइझिन फालेरो यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरातून ही माहिती दिली.

Goa Forest Fire
Goa Leopard: शिरसोडा येथे विहरीत पडला बिबट्या

गेल्या महिन्यात राज्यभरात जंगलामध्ये आगीच्या 74 घटना घडल्या होत्या. गेल्या महिन्यात राज्यभरातील खाजगी जमीन, राखीव जंगले, कोमुनिदाद जमीन आणि संरक्षित भागात या आगीच्या घटना घडल्या होत्या.

यात तीन वन्यजीव अभयारण्यांमधील 2.27 चौरस किलोमीटर क्षेत्र बाधित झाले होते. त्यासह एकूण सुमारे 4.18 चौरस किलोमीटर वनक्षेत्र आगीत खाक झाले होते.

मंत्री चौबे यांनी म्हटले आहे की, मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात नोंदवलेल्या 74 आगीच्या घटनांपैकी 32 आगीच्या घटना तीन वन्यजीव अभयारण्यांमध्ये नोंदल्या गेल्या. बहुतेक जंगलातील आग त्याच दिवशी आटोक्यात आली असली तरी, आगीच्या घटना दुर्गम आणि दूरच्या डोंगराळ भागात नोंदवली गेली होती.

भारतीय वायुसेनेच्या (IAF) सहाय्याने ग्राउंड टीमद्वारे या आगींवर नियंत्रण आणण्यात आले. त्यासाठी हेलिकॉप्टरमधून पाण्याचा फवाराही केला गेला.

Goa Forest Fire
Panaji Smart City: क्या है तुम्हारे शहर का हाल..? आजकाल पणजीतील रस्ते असे दिसताहेत, पाहा फोटो

जरी मंत्रालयाने जंगलातील आग रोखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना मदत केली असली तरी आगीपासून संरक्षण आणि व्यवस्थापन ही मुख्यत्वे राज्य/केंद्रशासित प्रदेशांची जबाबदारी आहे. राज्यात एकाही वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले नाही.

जंगलातील आगीशी लढण्यासाठी एनडीआरएफच्या दोन बटालियन्सना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे चौबे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com