Goa Dairy : गोवा डेअरी अध्‍यक्षपदी राजेश फळदेसाई

बिनविरोध निवड : बाराही संचालकांची निवडणुकीला उपस्‍थिती
Rajesh Phaldesai elected as new chairman of Goa Dairy
Rajesh Phaldesai elected as new chairman of Goa Dairy Dainik Gomantak

फोंडा : गोवा डेअरीच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राजेश फळदेसाई यांचा एकमेव अर्ज आल्याने त्‍यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. गोवा डेअरीच्या परिषद सभागृहात झालेल्‍या या निवडणुकीवेळी गोवा डेअरीचे सर्व बाराही संचालक उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून सहकार खात्याचे अधिकारी राजू मगदूम यांनी काम पाहिले.

गोवा डेअरीच्या संचालक मंडळाची निवडणूक 19 जून रोजी झाली होती. त्यात राजेश फळदेसाई व विठोबा देसाई गटाचे नऊ सदस्य निवडून आले होते. त्यामुळे गोवा डेअरीवर याच गटाचा अध्यक्ष निवडून येईल, हे निश्‍चित झाले होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, उल्हास सिनारी, विजयकांत गावकर, गुरुदास परब, माधव सहकारी, बाबूराव फट्टो देसाई, उदय प्रभू, नितीन प्रभुगावकर, बाबू फाळो, अनुप देसाई व श्रीकांत नाईक हे बाराही संचालक उपस्थित होते. यावेळी राजेश फळदेसाई यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्‍यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Rajesh Phaldesai elected as new chairman of Goa Dairy
Atal Setu : 'अटल सेतूच्या रस्ते दुरुस्तीला नोव्हेंबरचा मुहूर्त'

दरम्यान, गोवा डेअरीच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजेश फळदेसाई यांनी मागच्या संचालक मंडळातही काही काळ अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. गोवा डेअरीचे दूध उत्पादन कमी झाले आहे, त्यातच डेअरीचा पशुखाद्य प्रकल्पही व्यवस्थित चालत नाही यासंबंधी पत्रकारांनी विचारले असता, फळदेसाई म्‍हणाले की, नूतन संचालक मंडळ आधी सर्व बाबी तपासून दूधवाढीसाठी काही निर्णय घेणार आहे. त्याचबरोबर पशूखाद्य प्रकल्पही नफ्यात आणण्यासाठी प्रयत्‍न करणार आहे.

‘अमूल’ला टक्कर देऊ

गोवा डेअरीच्या दुधाला पहिली पसंती दिली जाते. मात्र डेअरीचे दूध उत्पादन घटल्‍याने सध्या अमूल दुधाला गोव्यात प्राधान्‍य दिले जातेय. त्यामुळेच अमुलची विक्री वाढली आहे. मात्र गोवा डेअरी अमुलला तोडीस तोड स्पर्धा करील, असा विश्‍‍वास फळदेसाई यांनी व्‍यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com