Ravindra Bhavan : रवींद्र भवनला प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनवणार; राजेंद्र तालक यांचा निर्धार

अध्यक्षपदाचा स्वीकारला ताबा; मडगावात स्वागत
Ravindra Bhavan
Ravindra Bhavan Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव रवींद्र भवनचे नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पदाचा ताबा घेतला. या प्रसंगी मडगावचे आमदार दिगंबर कामत व फातोर्डेचे माजी आमदार दामू नाईक उपस्थित होते.

यावेळी तालक म्हणाले की, रवींद्र भवनला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपल्यासह जनरल कौन्सिलचे सर्व सदस्य प्रयत्न करतील. रवींद्र भवनला गोव्यातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनविण्याचा निर्धार आहे.

Ravindra Bhavan
मृत्यूच्या दाढेतून बचावले ‘यूपी’चे रहिवाशी; चोडण येथील प्रकार

कॅन्टीन व स्वच्छता याला आपण प्रथम प्राधान्य देणार आहे. या संकुलात पुष्कळ बदल करायचे आहेत. मात्र, ते टप्प्याटप्प्याने केले जातील. रवींद्र भवनाद्वारे मडगाव शहराच्या सांस्कृतिक केंद्रात आणखी भर घालण्याचा आपला प्रयत्न असेल.

काही महिन्यांनी रवींद्र भवनात आल्यावर वेगळेपण जाणवेल, असेही तालक यांनी सांगितले. आमदार दिगंबर कामत म्हणाले, रवींद्र भवनकडून लोकांच्या पुष्कळ अपेक्षा आहेत.

Ravindra Bhavan
कोकण रेल्वेची बुधवारी गोव्यात बैठक, कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचा विषय निकाली निघणार का?

दामबाबाचे घेतले दर्शन

रवींद्र भवनचा ताबा घेण्यापूर्वी अध्यक्ष, उपाध्यक्ष व जनरल कौन्सिलच्या सदस्यांनी फातोर्डा लिंगावर जाऊन श्री दामबाबाचे दर्शन घेतले.या प्रसंगी रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, जनरल कौन्सिलचे सदस्य उमेश बांदोडकर, महेश कोनेकर, परेश नाईक, मिलाग्रीन गोम्स, श्र्वेता लोटलीकर, अनिल पै, नितीन प्रभुदेसाई, सावियो मास्कारेन्हस, गोपाळ नाईक, धनंजय मयेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com