Mahadayi Tiger project : ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर केल्यासच ‘म्हादई’चे रक्षण

माशेलात ‘म्हादई परम सत्य’मधून जनजागृती : राजेंद्र केरकर
Mahadai Tiger Project
Mahadai Tiger ProjectGomantak Digital Team
Published on
Updated on

Mahadayi Tiger project : म्हादईच्या रक्षणासाठी अभयारण्यातील काही भाग ‘व्याघ्र प्रकल्प’ जाहीर केल्यास निश्‍चितपणे म्हादईचे रक्षण होईल. अभयारण्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले असून हा प्रकल्प झाल्यास कर्नाटकच्या पाणी पळविण्याच्या कृतीवरच निर्बंध येतील. त्यामुळे म्हादईचे रक्षण होईल, असे मत पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी माशेल येथे पत्रकार संघातर्फे क्रांतिदिनानिमित्त आयोजित ‘म्हादई परम सत्य’ कार्यक्रमात व्यक्त केले.

माशेलातील लोटस् सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजेंद्र केरकर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. त्यांच्यासोबत सहवक्ते म्हणून पत्रकार राजू नाईक,पत्रकार संजय घुग्रेटकर उपस्थित होते.केरकर पुढे म्हणाले, म्हादईमुळे गोव्याची तहान भागवली जाते. कर्नाटकच्या कळसा -भांडुरा व अन्य प्रकल्पांमुळे म्हादईवर संकट आले आहे.

Mahadai Tiger Project
Goa Weather Update: राज्यात मॉन्सून जोर पकडणार, वेधशाळेचा अंदाज

कर्नाटकचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी या प्रश्‍नाबाबत सखोल अभ्यासाची गरज आहे. कर्नाटकचे वकील, राजकारणी प्रत्यक्ष कळसा-भांडुरा व अन्य ठिकाणी येऊन अभ्यास करतात, निरीक्षणे नोंदवितात. राजू नाईक म्हणाले, म्हादईच्या पाण्याचा उलट दिशेने प्रवाह वळविणे चुकीचे आहे. कर्नाटकची ही कृती अनैसर्गिक आहे.

Mahadai Tiger Project
Goa Revolution Day 2023: क्रांतिदिनाचा इतिहास आता अकरावीच्या पुस्तकातही, शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची माहिती

पर्यावरणप्रेमींचे मार्गदर्शन घ्या !

संजय घुग्रेटकर म्हणाले, कर्नाटकचे तत्कालिन मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या सरकारने १९७८ मध्ये म्हादईचे पाणी कर्नाटकाकडे वळवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून कर्नाटकमध्ये अनेक सरकारे आली, गेली. पण म्हादई प्रश्नी भूमिका बदलली नाही.मात्र,गोव्यात सरकार आपल्या पद्धतीने लढा देत आहे, त्यांना सर्वांनी गट, तट, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सहकार्य दिले पाहिजे. पर्यावरणप्रेमींचे मार्गदर्शन घेऊन लढा दिला तरच म्हादईवरील संकट दूर होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com