Vagator Tourist Death: वागातोरमध्ये पार्टीत नाचताना पर्यटकाचा मृत्यू...

शनिवारी 20 रोजी सायंकाळी उशिरा ही घटना घडली.
Vagator Tourist Death
Vagator Tourist DeathDainik Gomantak

Vagator Tourist Death: वागातोर येथील एका क्लबमध्ये पार्टीत नाचताना कोसळलेल्या आशुतोष नामक एका राजस्थानी युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी 20 रोजी सायंकाळी उशिरा ही घटना घडली. हा युवक आपल्या इतर दोन मित्रांसोबत गोव्यात आलेला. तो इव्हेंट शो व्यवस्थापनचे काम करायचा.

Vagator Tourist Death
Goa Live Updates 23 January 2024: गोव्यातील आजच्या ताज्या घडामोडी...

हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका क्लबमध्ये सुरू असलेल्या पार्टीत आशुतोष जडवाद (२८) हा नाचताना खाली कोसळला. त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना आधी जिल्हा इस्पितळात व नंतर जीएमसी मध्ये दाखल केले.

तिथे उपचार सुरू असतानाच त्याचे शनिवारीच निधन झाले. हणजूण पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली असून त्याच्या मृत्यूचे नक्की कारण समजलेले नाही. शेवटचे नंतर त्याचा व्हीसेरा राखून ठेवलेला असून त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे नक्की कारण समजू शकेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com