Narcotics Raid at Guririm: ड्रग्ज तस्करीप्रकरणी राजस्थानच्या युवकास अटक; 2.20 लाखाचे अमली पदार्थ जप्त

गोवा पोलिसांची कारवाई
Narcotics Raid at Guririm | youth from Rajasthan Arrested
Narcotics Raid at Guririm | youth from Rajasthan Arrested Dainik Gomantak

Narcotis Raid at Guririm: गोव्यातील बार्देश तालुक्यातील गिरी येथे पोलिसांच्या नार्कोटिस विभागाने टाकलेल्या छाप्यात 2.20 लाख रूपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी राजस्थानच्या युवकास अटक करण्यात आली आहे.

Narcotics Raid at Guririm | youth from Rajasthan Arrested
Dead Body in Goa Jungle: शेट्येवाडो येथील जंगलात आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

बार्देश तालुक्यातील गिरी येथील गिरी क्रॉस येथे छापा टाकण्यात आला होता. येथे पप्पू राम (वय 30 वर्षे) याला रंगेहाथ अटक करण्यात आली. तो मूळचा उबुंटू बीटा स्कूल, उम्मेद नगर रोड, मथानिया, जोधपूर, राजस्थान येथील आहे.

त्याच्याकडून एमडीएमए सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आढळून आला.

त्याच्याकडे एकूण 15.10 ग्रॅम अमली पदार्थ सापडले. तसेच एक पिशवी जप्त करण्यात आली आहे. त्यात 770 ग्रॅम अमली पदार्थ असल्याचा संशय आहे. त्या पिशवीमध्ये कोरड्या हिरवट रंगाच्या फुलांच्या आणि फळांच्या शेंड्यांचा समावेश आहे.

तो गांजा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 2 लाख 20 हजार 000 रूपये इतकी आहे.

Narcotics Raid at Guririm | youth from Rajasthan Arrested
Margao Car Accident: खारेबांध मडगाव येथे भरधाव कारची विजेच्या खांबाला धडक

पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात हेड कॉन्स्टेबल इर्शाद वाटंगी, पोलिस कॉन्सटेबल मबलेश्वर सावंत, पोलिस कॉन्स्टेबल सायमुल्ला मकानदार, सनील धुरी, सुदेश मतकर, सोनी फर्नांडिस यांचा समावेश होता.

सध्या डीवाएसपी सूरज यांच्या देखरेखीखाली पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com