
केपे तालुक्यातील खडकाळ आणि पाणथळ रानावनातून 28 जुलै ते 3 ऑगस्ट अशी सात दिवस चाललेल्या ‘रेनफॉरेस्ट चॅलेंज (आरएफसी) इंडिया 2025 स्पर्धेत’ देशभरातील 77 संघांचा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला.
4x4 एक्स्ट्रीम, 4x4 मॉडीफाइड आणि 4x4 स्टॉक अशा तीन श्रेणीत ही स्पर्धा चालली होती. या स्पर्धेची ही 11वी आवृत्ती होती. या स्पर्धेत कर्नाटकातील 24 तर महाराष्ट्रातील 18 संघ सहभागी झाले होते.
तेलंगण, दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, केरळ, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, मेघालय आणि गोवा या राज्यातील संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ड्रायव्हिंग कौशल्य, वाहन दुरुस्ती तंत्र, टीम वर्क, शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती या साऱ्याची परीक्षा या स्पर्धेत घेतली गेली.
प्रत्येक संघाने स्पर्धेसाठी विशेष रचलेल्या 26 खडतर टप्प्यांचा सामना केला. सध्या ही स्पर्धा देशातील कठीण आणि प्रतिष्ठित ऑफ रोड मोटर्स स्पोर्ट स्पर्धांपैकी एक गणली जाते. ती केवळ व्यक्ती आणि यंत्र यांची क्षमता तपासत नाही तर गोव्यातील वैविध्यपूर्ण नैसर्गिक भूप्रदेशांमुळे सामोरे ठाकणाऱ्या उच्च सहनशक्तीच्या आव्हानांसाठी एक आदर्श वातावरण तयार करते.
या स्पर्धेतील 4x4 एक्स्ट्रीम श्रेणीतील विजेत्याला मलेशिया येथे होणाऱ्या रेन फॉरेस्ट चॅलेंज ग्लोबल फिनालेमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. या स्पर्धेसाठी गोवा पर्यटन खात्याचे सहकार्य लाभले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.