
पाण्याने निथळत असलेली जंगले, चिखलमय वाटा आणि पावसाळ्यातील गडद हिरवी घनदाटता 'रेन फॉरेस्ट चॅलेंज' (RCF) इंडियाचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहेत. चार चाकी गाड्यांच्या शर्यतीची ही आवृत्ती पूर्वीपेक्षा मोठ्या, धाडसी आणि खडतर आव्हानांनी भरलेली असेल. देशभरातील 'ऑफ रोडर्स त्यांचे ड्रायव्हिंग कौशल्य, वाहन क्षमता अडीच सहनशक्तीची परीक्षा देण्यासाठी गोव्याच्या उंच-सखल भूभागावर एकत्र येणार आहेत- भारताचा अंतिम 'ऑफ रोड चॅम्पियन' मुकुट पटकावणारी ही शर्यत आहे.
आरएफसी ग्लोबल सिरीजचे अधिकृत भारतीय प्रतिनिधी असलेल्या कुगर मोटरस्पोर्टने ‘आरएफसी इंडिया शर्यतीला आता देशातील सर्वात कठीण, प्रदीर्घ आणि सर्वात प्रतिष्ठित ऑफ रोड ड्रायव्हिंग शर्यत बनवले आहे. या शर्यतीतील विजेत्याला मलेशियातील ग्लोबल आरएफसी ग्रँड फायनलमध्ये थेट प्रवेश मिळतो.
2024 मध्ये झालेल्या या शर्यतीच्या दहाव्या आवृत्तीत महिला स्पर्धकांसह विक्रमी 41 संघ सहभागी झाले होते. 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या कालावधीत होणारी या शर्यतीच्या 11व्या आवृत्तीत त्यापेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होत आहेत. यंदा या स्पर्धेत दोन नवीन श्रेणी, 4x4 स्टॉक आणि 4x4 मॉडीफाइड, अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. जुनी 4x4 एक्स्ट्रीम ही श्रेणी देखील राखण्यात आली आहे. नवीन श्रेणींमुळे ही शर्यत अधिक सर्वसमावेशक होईल अशी अपेक्षा आहे. गोव्याच्या मुसळधार पावसामुळे या शर्यतीतील वैविध्य आणि उत्साह अधिक वाढतो आणि प्रत्येक श्रेणी स्वतःची नवीन आव्हाने घेऊन येते.
या शर्यतीसाठी मार्च 2025 मध्ये नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक संघानी त्यात नोंदणी केली आहे. यंदाच्या उल्लेखनीय स्पर्धकांमध्ये सह्याद्री ऑफ रोडर्स, सातारा ऑफ रोडर्स, अरुणाचल प्रदेश मधील मानभुम ऑफ रोडर्स क्लब, बेंगळूर येथील जीपर्स आणि केरळचा गतविजेता संघ कोलोसस यांचा समावेश आहे. या स्पर्धेत नोंदणी करण्याची कमाल मर्यादा 75 संघांसाठी आहे. श्रेणीनुसार या स्पर्धेचे प्रवेश शुल्क 40,000 ते 90 हजार रुपये आहे.
या शर्यतीत स्पर्धा करायची नसली तरीसुद्धा कुणीही ‘टुरिंग एडवेंचरर’ म्हणून तिचा भाग बनू शकतो. गोव्याच्या अंतर्गत भागाची ओळख होण्याच्या दृष्टीने तसेच स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी अनेक जण टुरिंग एडवेंचरर म्हणून त्यात भाग घेत असतात. कुगरचे संचालक संस्थापक आशिष गुप्ता म्हणतात, 'ही केवळ एक शर्यत नाही तर हा एक तल्लीन करणारा अनुभव आहे, जो स्पर्धकांना त्यांच्या मर्यादा ओलांडण्यास, त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यास आणि समविचारी उत्साही लोकांशी जोडून घेण्यास मदत करतो.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.