वादळी वाऱ्याचा फोंड्यात फटका, तर कुडणेत घरावर कोसळली वीज

संबंधितांना मिळणार नुकसान भरपाई
Rain with lightning keeps fire, power personnel busy
Rain with lightning keeps fire, power personnel busy Dainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : अवकाळी पावसाने सबंध राज्याला भंडावून सोडले असून वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने पडझड सुरूच आहे. फोंडा तालुक्यात तर ही पडझड सुरूच असून अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त होण्याबरोबरच वीज खांबही मोडून पडत आहेत. काल (गुरुवारी) संध्याकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शिरोडा, तळावली तसेच अन्य काही भागात झाडे कोसळली. दोन घरांचे त्यामुळे नुकसान झाले. दरम्यान, कुडणे येथील गोकुळदास अनंत मळीक यांच्या घरावर काल रात्री वीज कोसळली. यात फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, गिझरसह सुमारे चार लाखांचे साहित्य खाक झाले आहे. (Rain with lightning keeps fire, power personnel busy)

संध्याकाळी अचानकपणे वादळी वारा आणि विजा चमकून पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे लोकांची धांदल उडाली. कामावरून घरी परतणाऱ्या लोकांना तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.

Rain with lightning keeps fire, power personnel busy
बेकायदा वाळू उत्खननावर पुन्हा छापा 31 होड्या जप्त, पेडणे पोलिसांची कारवाई

शिरोडा भागात आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एका घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले तर तळावली भागात मंदिराच्या मागे असलेल्या घरावर झाड कोसळल्याने या घराचेही नुकसान झाले. काल संध्याकाळी अग्निशामक दलाला नऊ कॉल्स आले. मात्र सर्वाधिक हानी वाळपई भागात झाली.

वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले तर वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. आंबा, फणस, केळी, पोफळीची झाडे काही ठिकाणी जमीनदोस्त झाली. उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. दरम्यान, कृषीमंत्री रवी नाईक यांनी वादळी वारा आणि पाऊस यामुळे हानी झालेल्या भागाची पाहणी करून नुकसानीचा आकडा निश्‍चित करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले. मोठ्या झाडांसह पीक देणाऱी छोटी झाडे, किमती फुलझाडांची नुकसानीही स्पष्ट करण्याचे आदेश दिले असून संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com