वास्कोत जुगार अड्ड्यावर छापा; 12 जणांना अटक

वास्को येथील एचडीएफसी बँकेच्या मागील जुगार अड्ड्यावर छापा
vasco News
vasco News Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने काल रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास वास्को येथील एचडीएफसी बँकेच्या मागील बाजूस असलेल्या एका दुकानाच्या पहिल्या मजल्यावरील जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

(Raid on vasco's gambling den; 12 people arrested )

vasco News
‘आयआयटीसाठी शेतजमीनच का हवी?’; काँग्रेसचा सवाल

यावेळी जुगार खेळत असलेल्या 12 जणांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून 68,500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

vasco News
मराठी शाळा संपविण्याचा डाव : सुभाष वेलिंगकर

माहितीनुसार, वास्को येथील एका दुकानावर असलेल्या जागेत जुगार खेळण्यासाठी लोकांची गर्दी होत होती. या माहितीची पडताळणी करून ही कारवाई करण्यात आली. या फ्लॅटचे दार आतून बंद करून जुगार सुरू होता. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच काहींनी रक्कम गायब केली.

मराठी शाळा संपविण्याचा डाव: सुभाष वेलिंगकर

पणजी: राज्यातील काही मराठी व कोकणी शाळांचे विलीनीकरण इतर शाळांमध्ये करण्याचा घाट सरकारने चालविला आहे. एकंदरीत मातृभाषेतील शाळा संपविण्याचा विडा सरकारने उचलला असल्याचे प्रतिपादन भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांनी केले.

सिदार्थ भवन पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत प्रविण नेसवणकर, सुरेंद्र पाळणी व सुरेश डिचोलकर उपस्थित होते. वेलिंगकर पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत नव्या मराठी व कोकणी शाळांसाठी 200 हून अधिक अर्ज सरकारकडे पाठविण्यात आले. मात्र, एकाही शाळेला परवानगी देण्यात आलेली नाही.

जर शाळांचे विलीनीकरण झाले, तर शिक्षणाच्या हक्काप्रमाणे 1 कि.मी. अंतरावर शाळा असावी ही तरतुद सरकार धुडकावत आहे. शाळांचे विलीनीकरण दुसऱ्या शाळांमध्ये करू नये, प्राचार्य माधव कामत अहवालाची अमंलबजावणी करावी, असेही प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com