Goa Mining |
Goa Mining |Dainik Gomantak

Goa Mining: बेकायदा चिरेखाणीवर छापा; वांते-सत्तरीत मशिनरी जप्त

वांते-सत्तरीत खाण खात्याने बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून मशिनरी जप्त केली.
Published on

वांते-सत्तरीत खाण खात्याने बेकायदा चिरेखाणीवर छापा टाकून मशिनरी जप्त केली. वांते-सत्तरीत गेली अनेक वर्षे सरकारी जमिनीत बेकायदा चिरेखाणी सुरू हाेत्या.

राजकीय आशीर्वादाने सुरू असलेल्या चिरेखाणींवर कारवाई केली जात नव्हती. काही दिवसांपूर्वी सुमारे 40 स्थानिकांनी सह्या करून चिरेखाणीविरोधात खाण खात्याकडे तक्रार दिली होती. तरीही त्या खाणीवर कारवाई केली जात नव्हती.

पण काल तक्रारदारांनी या चिरेखाणीविरोधात आक्रमक होऊन ‘जर कारवाई करीत नसाल तर वरिष्ठांकडे तक्रार करू’, असा इशारा दिल्यावर सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि त्यांनी आज बेकायदेशीर खाणीवर कारवाई केली. यापूर्वी वांते-सत्तरीत चिरेखाणीवर छापा टाकायचा असल्यास आधीच त्यांना माहिती मिळत हाेती.

त्यामुळे ते चिरेखाणवाले मशिनरी लपवून ठेवत आणि अधिकारी गेल्यानंतर परत काम सुरू करीत; पण यावेळी तक्रारदार त्या जागेवर ठाण मांडून बसला. त्यामुळे मशिनरी बाहेर काढता आली नाही. साहजिकच अधिकाऱ्यांना ही मशिनरी जप्त करणे भाग पडले.

Goa Mining |
Goa News: शिवजयंती अन् कार्निवल एकाच वेळी; मडगावात आज 500 पोलिस तैनात

वांते-सत्तरीत दहापेक्षा जास्त ठिकाणी सरकारी जमिनीत चिरेखाणी सुरू हाेत्या. त्यापैकी दहाजणांच्या मशिनरी जप्त करण्यात आल्या आहेत. खाण खात्याने सत्तरी मामलेदार दशरथ गावस यांच्या उपस्थितीत कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com